घरमनोरंजनशाहरुखसोबत काम करण्याची ऑफर समांथाने धुडकावली

शाहरुखसोबत काम करण्याची ऑफर समांथाने धुडकावली

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला मुलगा आर्यन खानमुळे फार चिंतेत आहे. सध्या आर्यन खान आर्थर रोड जेलमध्ये शिक्षा भोगतोय. आर्यनचा जामीन अद्याप मंजूर न झाल्याने त्याला २० ऑक्टोबरपर्यंत जेलमध्येच राहावे लागणार आहे. या प्रकरणामुळे आता शाहरुख खानचे आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगला ब्रेक लागला आहे. दरम्यान आता शाहरुखसोबत काम करण्यासही अभिनेत्रींचा नकार येत असल्याची माहिती समोर आली आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने शाहरुखसोबत एका चित्रपटात काम करण्याची ऑफर धुडकावली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

- Advertisement -

दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली यांच्या आगामी ‘लायन’ चित्रपटाविषयी बरीच चर्चा रंगतोय. या चित्रपटासाठी अभिनेत्री समांथा रुथ हिला ऑफर देण्यात आली होती. मात्र या चित्रपटात शाहरुख असल्याने तिने काम करण्यास स्पष्ट नकार दिल्याचे म्हटले जातेय. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय ‘लव्हबर्ड’ कपल म्हणून अभिनेत्री समांथा रुथ आणि नागा चैतन्यचे नाव घेतले जायचे. मात्र काही दिवसांपूर्वी दोघं विभक्त झाले. अशातच समांथाकडे सध्या अनेक चित्रपटांच्या ऑफर आहेत. ती त्यांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तिने शाहरुखसोबत ‘लायन’ चित्रपट करण्यास नकार दिल्याचेही म्हटले जात आहे. याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

समांथा लवकरंच ड्रिम वॉरियर पिक्चरच्या आगामी सिनेमात झळकणार आहे. समांथाने नुकतीच या चित्रपटासंदर्भात एक पोस्ट करत चित्रिकरणास सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले. समांथा य़ा चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -