घरमनोरंजनपरिणीति-अर्जुन गाजवत आहेत ओटीटी प्लॅटफॉर्म,'संदीप और पिंकी फरार'प्रेक्षकांच्या उतरला पसंतीस!

परिणीति-अर्जुन गाजवत आहेत ओटीटी प्लॅटफॉर्म,’संदीप और पिंकी फरार’प्रेक्षकांच्या उतरला पसंतीस!

Subscribe

सायना,द गर्ल ऑन द ट्रेन, या दोनही चित्रपटानंतर परिणीतीचा हा 3 रा चित्रपट ओटीटी वर रिलीज होत आहे. सिनेमा ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच #SandeepAurPinkyFaraar अश्या प्रकारचा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

बॉलिवूड चित्रपट सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवत आहेत. अनेक बिग बजेट चित्रपट ओटीटी वर रिलीज करण्याचा कल वाढत आहे. नुकतच अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचा रोमांचक थ्रिलर चित्रपट ‘संदीप और पिंकी फरार’ 20 मे रोजी मजेझओण प्राइम वर रिलीज करण्यात आली आहे. सायना,द गर्ल ऑन द ट्रेन, या दोनही चित्रपटानंतर परिणीतीचा हा 3 रा चित्रपट ओटीटी वर रिलीज होत आहे. सिनेमा ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच #SandeepAurPinkyFaraar अश्या प्रकारचा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
दीबाकर बॅनर्जी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.तसेच नीना गुप्ता, रघुवीर यादव आणि जयदीप अहलावत यांची सुद्धा वर्णी लागली आहे. ‘संदीप और पिंकी फरार’ पुर्णपणे दोन वेगळ्या लोकांची कथा आहे. ज्याचे आयुष्य एकत्र जोडले जाते. पिंकेश दहिया या “पिंकी” (अर्जुन कपूर), एका हरीयाणवी पोलिस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे तर संदीप कौर (परिणीति चोप्रा ) कॉर्पोरेट जगातील एक महत्वाकांक्षी मुलगी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

- Advertisement -

संदीप( परिणीति चोप्रा ) परिवर्तन नावाच्या बँकमध्ये उच्च पदावर कार्यरत असते तसेच ती एक गोल्ड मेडललिस्ट सुद्धा आहे. तिने बँकेला वाचवण्यासतही मोठा घोटाळा केला आहे. पण तिचे अधिकारी बॉस तिला याचं क्रेडिट देण्यास तयार नाही. पिंकी( अर्जुन कपूर) सस्पेंडेड पोलिस अधिकारी असतो. त्याला संदीपला मारण्याची सुपारी मिळते आणि इथूनच कथेच्या मुख्य भागाला सुरुवात होते.


हे हि वाचा – प्रियांका चोप्रा उतरली निक जोनसच्या मदतीला,बिलबोर्ड म्यूझिक अवॉर्डचे करणार सादरीकरण!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -