घरमनोरंजनप्रियांका चोप्रा उतरली निक जोनसच्या मदतीला,बिलबोर्ड म्यूझिक अवॉर्डचे करणार सादरीकरण!

प्रियांका चोप्रा उतरली निक जोनसच्या मदतीला,बिलबोर्ड म्यूझिक अवॉर्डचे करणार सादरीकरण!

Subscribe

निक जोनस बिलबोर्ड म्यूझिक अवॉर्ड्चे सादरीकरण करणार होता. पण आता या अवॉर्ड सदरीकरनासाठी प्रियंका चोप्रा देखील निकच्या मदतीस उतरली आहे. निकच्या अचानक झालेल्या दुर्घटणेनंतर प्रियंका चोप्रा निकला संपूर्णपणे साथ देणार आहे

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या पती निक जोनस याला नुकतच रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची बातमी समोर येत आहे. एका दुर्घटणे दरम्यान निकला दुखापत झाली असल्याचे बोलण्यात येत आहे. अपघातादारम्यान त्याचा छातीतील बरगड्यामधील हाड तुटले असल्याची माहिती मिळत आहे. निकची प्रकृती सध्या स्वस्थ असून  संकटातून वाचला असल्याचे संगितले आहे. तसेच माझी शारीरिक प्रकृती सध्या स्थिर नसून मला थोड्याफार प्रमाणात कमकुवतपणा वाटत असल्याचे निक म्हणाला. निक जोनस बिलबोर्ड म्यूझिक अवॉर्ड्चे सादरीकरण करणार होता. पण आता या अवॉर्ड सदरीकरनासाठी प्रियंका चोप्रा देखील निकच्या मदतीस उतरली आहे. निकच्या अचानक झालेल्या दुर्घटणेनंतर प्रियंका चोप्रा निकला संपूर्णपणे साथ देणार आहे २४ मे रोजी IST मध्ये होणारा अवॉर्ड शो बीबीएमए 2021 मधील पहिला असा अवॉर्ड शो होणार आहे,ज्याचे प्रसारण अमेरिकामध्ये  नागरिकांना कोव्हिड १९ लसीकरण उपलब्ध होण्याकरिता करण्यात  येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Billboard Music Awards (@bbmas)

- Advertisement -

सूत्रानुसार सांगण्यात येत आहे की प्रियंका चोप्रा बीबीएमए २०२१ अवॉर्ड शो चा भाग होणार आहे. निक जोनसच्या आकस्मित दुर्घटणेनंतर निकच्या मदती करिता प्रियंका शो मध्ये सहभाग घेणार आहे. तसेच प्रियंका यासाठी सज्ज झाली आहे.वर्कफ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास निक जोनस याने नुकतच ‘स्पेसमॅन’ हा अल्बम रिलीज केला आहे. तसेच जुमांजी: वेलकम टू द जंगल, मिडवे, केऑस वॉकिंग मध्ये अभिनय करताना दिसणार आहे.


हे हि वाचा – रुग्णालयाच्या निष्काळजीपणाने वडिलांचे निधन,संभावना सेठचा गंभीर आरोप!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -