घरमनोरंजनभन्सालींच्या 'या' चित्रपटात जाफरींच्या मुलासह करणार शर्मिन सेगल पदार्पण

भन्सालींच्या ‘या’ चित्रपटात जाफरींच्या मुलासह करणार शर्मिन सेगल पदार्पण

Subscribe

भन्सालींच्या चित्रपटात पदार्पण करणाऱ्या या जोडीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांमध्ये आहे

अभिनेता मीजान जाफरी आणि अभिनेत्री शर्मिन सेगल या दोघांच्या खूपच चर्चा आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माता संजय लीला भन्सालींची आगामी फिल्म मलाल या चित्रपटात दोघेही एकत्र काम करताना दिसणार आहे. भन्सालींच्या चित्रपटात पदार्पण करणाऱ्या या जोडीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांमध्ये आहे. संजय लीला भन्सालींची पुतणी शर्मिन मलाल यामधून पदार्पण करणार असून तिच्यासह जावेद जाफरीचा मुलगा मीजानही अभिनय करताना दिसणार आहे.

मलाल या चित्रपटाची निर्मिती संजय लीला भंसाली, भूषण कुमार, महावीर जैन आणि कृष्णा कुमार करणार असून मंगेश हडावले हे दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १८ मे २०१९ला प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती चित्रपट विश्लेषक यांनी ट्विट करून सांगितली.

- Advertisement -

मलाल हा रोमॅंटिक चित्रपट असून यामध्ये शर्मिन आणि मीजान मोठ्या पडद्यावर रोमांस करताना प्रेक्षकांना पहिल्यांदा बघायला मिळणार आहे. भन्सालींनी यापुर्वी बऱ्याच नव्या चेहऱ्यांना लॉंच केले आहे. मात्र भन्साली आता जावेद जाफरीचा मुलगा मीजान आणि बेला सेगलची मुलगी शर्मिनला लॉंच करण्याच्या पुर्ण तयारीत आहे.

- Advertisement -

संजय लीला भन्सालींना बॉलिवूडच्या यशस्वी चित्रपट निर्मात्यांपैकी ओळखले जाते. मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या चित्रपट निर्मात्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि पद्मश्री सारख्या प्रतिष्ठित पुरस्काराने सम्मानित केले गेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -