घरताज्या घडामोडीAryan Khan Case नंतर किंग खानचे इन्स्टाग्रामवर कमबॅक! विसरला insta ID पासवर्ड?

Aryan Khan Case नंतर किंग खानचे इन्स्टाग्रामवर कमबॅक! विसरला insta ID पासवर्ड?

Subscribe

आर्यनला जामीन मिळाल्यानंतर आता जवळपास 3 महिन्यांनंतर शारुखने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट अँक्टिव्ह केले आहे. शाहरुखची लास्ट पोस्ट 19 सप्टेंबर 2021ची आहे. तब्बल चार महिन्यांनी शाहरुखला इन्स्टाग्रामवर अँक्टिव्ह झाल्याचे पाहून त्याच्या फॅन्सने त्याचे स्वागत केले आहे.

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने (Shahrukh Khan )  जवळपास 4 महिन्यांनी इन्स्टाग्रामवर (instagram)  कमबॅक केले आहे. एक व्हिडीओ शाहरुखने इन्स्टावर शेअर केला असून त्यात पत्नी गौरी खानही (Gauri Khan )  दिसत आहेत. मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक  (Aryan Khan Drugs Case) केल्यानंतर शाहरुख अनेक दिवस सोशल मीडियापासून दूर होता. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर आता जवळपास 3 महिन्यांनंतर शारुखने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट अँक्टिव्ह केले आहे. शाहरुखची लास्ट पोस्ट 19 सप्टेंबर 2021ची आहे. तब्बल चार महिन्यांनी शाहरुखला इन्स्टाग्रामवर अँक्टिव्ह झाल्याचे पाहून त्याच्या फॅन्सने त्याचे स्वागत केले आहे.

शाहरुखने एका पेड पार्टनरशिपचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यावर वेलकम बॅक किंग अशा कमेंट त्याच्या चाहत्यांनी केल्या आहेत. व्हिडीओ शेअर करत शाहरुखने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, ‘फार कमी वेळा तुम्ही अशा प्रोजेक्टसोबत जोडले जाता जिथे कला आणि टेक्नोलॉजीचा सुसंवाद असतो’. या व्हिडीओच्या सुरुवातीला शाहरुख एका लग्झरी कारमधून मोठ्या बंगल्याजवळ पोहोचतो. त्यानंतर शाहरुख सोफ्यावर बसून टीव्हीच्या दिशेने इशारा करतो तेव्हाच तिथे गौरी खानची एंट्री होत. या व्हिडीओमध्ये शाहरुख आणि गौरी फार सुंदर दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

- Advertisement -

 

- Advertisement -

विसरला insta ID पासवर्ड?

शाहरुखने शेअर केलेली पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याच्या चाहत्यांनी त्यावर दणकून कमेंट केल्या आहेत. काही मिनिटात शाहरुखचा व्हिडीओ तब्बल 7 लाखांहून अधिक जणांनी पाहिला तर 85 हजारांहून अधिक लोकांनी त्यावर कमेंट केल्या. ‘किंग इज बॅक’, ‘इतक्या मोठ्या ब्रेक नंतर तुझी पोस्ट पाहून चांगले वाटले’, अशा कमेंट केल्या आहेत. तर एका युझर्सने म्हटले आहे की, ,अखेर खान साहेबांना इन्स्टाग्रामचा आयडी पासवर्ड मिळाला’.  शाहरुखच्या पोस्टवरील ही कमेंट सर्वाधिक व्हायरल होत आहे.

खरंतर आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुखने सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला होता. त्याने सर्व सोशल मीडियावरुन काही काळासाठी ब्रेक घेतला. शाहरुख सोशल मीडियावर सक्रीय नसल्याने चाहत्यांनी शाहरुख त्याचा आयडी पासवर्ड विसरला आहे का असे म्हणत ट्रोल केले होते.


हेही वाचा – Shahrukh Khan: चार वर्षांनी किंग खान शाहरुखचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -