घरताज्या घडामोडीShahrukh Khan: चार वर्षांनी किंग खान शाहरुखचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन

Shahrukh Khan: चार वर्षांनी किंग खान शाहरुखचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन

Subscribe

बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी सध्या न्यू इअर सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत शाहरुख मात्र त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त

बॉलिवूडचा किंग खानच्या नव्या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख लवकरच त्याच्या नव्या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. शाहरुख तब्बल ४ वर्षांनी सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. शाहरुखने त्याच्या अपकमिंग सिनेमाच्या सेटवरील त्याचा एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी सध्या न्यू इअर सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहेत शाहरुख मात्र त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

शाहरुख लवकरच पठाण या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरुख पठाण सिनेमाचे शुटींग अर्धवट टाकून  मुंबईत परतला होता. त्यानंतर जवळपास २-३ महिने शाहरुखने त्याचे संपूर्ण काम थांबवले होते. मात्र आता नव्या जोशाने शाहरुख पठाण सिनेमाच्या शुटींगला लागला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SRK PATNA FC (@srkpatnafc)

- Advertisement -

लेटेस्ट असे म्हणत शाहरुखच्या फॅन पेजवर फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये शाहरुखने ब्लॅक कलरचा शर्ट घातला असून फोटोमध्ये शाहरुखसोबत अभिनेता दिगंता हजारिया दिसत आहे. शाहरुख सध्या पठाण सिनेमाचे शुटींग करण्यात व्यक्त असल्याचे सांगण्यात येत आहे. पठाण सिनेमात शाहरुख सोबत अभिनेत्री दीपिका पादूकोन आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख सोबतच्या फोटोनंतर अभिनेता दिगंता हजारिया देखील या सिनेमात दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

ऑक्टोबर महिन्यात शाहरुख खान पठाण सिनेमाच्या शुटींगसाठी  गेला होता. दीपिका पादूकोन, जॉन अब्राहम यांना मुंबई एअर पोर्टवर स्पॉट करण्यात आले होते. मात्र आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरुखने त्याचे सगळे प्रोजेक्ट तात्काळ थांबवून तो मुंबईला आला होता. मात्र पुन्हा एकदा शाहरुख सिनेमाच्या शुटींगला परतला आहे. आर्यन खान प्रकरणानंतर शाहरुखची सिनेमाच्या सेटवरील सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचा – Ankita lokhande: पाय फ्रॅक्चर असतानाही अंकिता लोखंडे परदेसी गाण्यावर थिरकली

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -