घरमनोरंजन'बिग बॉस'चे घर विनयभंग करणाऱ्यांसाठी... MeToo प्रकरणातील साजिद खानवर शर्लिन चोपडाचा आक्षेप

‘बिग बॉस’चे घर विनयभंग करणाऱ्यांसाठी… MeToo प्रकरणातील साजिद खानवर शर्लिन चोपडाचा आक्षेप

Subscribe

'बिग बॉस 16'मध्ये Me Too आरोपी साजिद खान सुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. मात्र, आता साजिद खानला 'बिग बॉस 16'मध्ये घेतल्यामुळे वादविवाद सुरु झाला आहे.

हिंदी टेलिव्हिजनवर लोकप्रिय रियालिटी शो ‘बिग बॉस 16’ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. ‘बिग बॉस 16’ मध्ये यावेळी विविध स्पर्धकांना सहभागी करण्यात आलं आहे. ‘बिग बॉस 16’मध्ये Me Too आरोपी साजिद खान सुद्धा स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. मात्र, आता साजिद खानला ‘बिग बॉस 16’मध्ये घेतल्यामुळे वादविवाद सुरु झाला आहे. अभिनेत्री शर्लिन चोपड़ाने साजिद खानला ‘बिग बॉस 16’ घेतल्यामुळे आरोप केले आहेत.

शर्लिन चोपड़ाने विचारला सलमान खानला प्रश्न

- Advertisement -

Me Too आरोपी साजिद खानला ‘बिग बॉस 16’ मध्ये स्पर्धक म्हणून घेतल्यामुळे अभिनेत्री शर्लिन चोपड़ाने थेट सलमान खानलाच प्रश्न विचारला आहे. शर्लिन चोपड़ाने एका मुलाखतीत सलमान खानला विचारलं की ‘बिग बॉस’ चे घर विनयभंग करणाऱ्यांसाठी आहे का? हा प्रश्न तिने ‘बिग बॉस’ कार्यक्रमाच्या निर्मात्यांना देखील विचारला आहे.

दरम्यान, जेव्हापासून साजिद खानला या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी करण्याचे विचारण्यात आलं तेव्हापासून त्याचा विरोध केला जात आहे. आता शर्लिन चोपडाने पुन्हा एक ट्वीट करत लिहिलं की, “त्यांनी मला त्यांचा प्रायव्हेट पार्ट दाखवून त्याला 0 ते 10 मध्ये रेट द्यायला सांगितलं. मी बिग बॉसच्या घरामध्ये जाऊ इच्छिते आणि त्यांना रेटिंग देऊ इच्छिते. भारताला पाहू तरी दे एक सर्वाइवर एका मोलेस्टरसोबत कशा प्रकारे डील करतात. कृपया यावर काहीतरी स्टँड घ्या सलमान खान”

- Advertisement -

साजिद खान सारख्या राक्षसाला बिग बॉस आणि सलमान खानने आश्रय दिला

या आधीच्या एका मुलाखतीमध्ये शर्लिन चोपडाने सांगितलं होतं की, मी एकटी पीडित नाही. माझ्या सारख्या अनेक आहेत. सगळ्यांना समान अनुभव आला आहे. अशा राक्षसाला बिग बॉस आणि सलमान खानने आश्रय दिला आहे. तुम्हीच सांगा हे योग्य आहे का? बिग बॉसचे घर विनयभंग करणाऱ्या व्यक्तींसाठी आहे का? साजिद खानला या कार्यक्रमामध्ये घेतल्यामुळे उर्फी जावेद, मंदाना करीमी, सोना मोहपात्रा, देवोलीना भट्टाचार्य यांनी देखील विरोध दर्शवला आहे. तसेच या संदर्भात केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना देखील त्यांनी पत्र लिहिले आहे.


हेही वाचा :

किशोर कुमार : रसिकांवर अधिराज्य गाजविणारा आवाज

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -