घरताज्या घडामोडीआणि 'लोच्या झाला रे' टीमला हॉटेलमध्ये दिसलं.....

आणि ‘लोच्या झाला रे’ टीमला हॉटेलमध्ये दिसलं…..

Subscribe

पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी दिग्दर्शित 'लोच्या झाल्या रे' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रीकरणादरम्यान लंडनमध्ये संपूर्ण टीमसोबत लोच्या झाला होता. चित्रीकरण एका मोठ्या महालात असल्यामुळे सीन शूट झाल्यानंतर प्रत्येक कलाकाराला आराम करायला एक प्रशस्त खोली दिली होती. जी अतिशय टापटीप असायची. या भव्य खोल्यांमध्ये अनेक राजमहाराजांच्या मोठमोठ्या फोटोफ्रेम लावल्या होत्या.

भव्य महाल, प्रशस्त खोल्या, राजेशाही थाट, भिंतींवर राजामहाराजांचे फोटो, डोळे दिपवून टाकणारा हा सगळा नजारा आणि त्यात एक रहस्य. प्रश्न पडला असेल ना हे काय आहे नक्की? तर हे रहस्य दडले आहे हॉंटेड बर्मिंगममध्ये.  पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी दिग्दर्शित ‘लोच्या झाल्या रे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रीकरणादरम्यान लंडनमध्ये संपूर्ण टीमसोबत लोच्या झाला होता. चित्रीकरण एका मोठ्या महालात असल्यामुळे सीन शूट झाल्यानंतर प्रत्येक कलाकाराला आराम करायला एक प्रशस्त खोली दिली होती. जी अतिशय टापटीप असायची. या भव्य खोल्यांमध्ये अनेक राजमहाराजांच्या मोठमोठ्या फोटोफ्रेम लावल्या होत्या.

अंकुश चौधरी अनेकदा ते फोटोज न्याहाळत असे. एकदा अंकुशचा सीन झाला आणि अंकुश त्याच्या खोलीत आराम कारण्यासाठी गेला. अंकुशची खोली असल्याने अंकुशचे थोडे सामान इथेतिथे विखुरलेले होते. अंकुश त्या खोलीत गेला आणि झोपला. अचानक त्याला एक विचित्र स्वप्न पडले आणि तो पटकन उठला. त्या स्वप्नात त्याला त्या फोटोंमधील राजेमहाराजे दिसले. अंकुशला वाटले, त्यांच्या खोलीमध्ये मी सामान अस्थाव्यस्थ ठेवले आहे, हे त्यांना आवडले नाही म्हणून ते माझ्या स्वप्नात आले. थोड्या वेळाने अंकुश खाली जेवायला गेला आणि त्याने हा किस्सा सगळ्यांसोबत शेअर केला. त्यानंतर प्रत्येक जण आपापले भुतांबाबत आलेले अनुभव सांगू लागला. त्यात तिथल्या स्थानिकांनीही सांगितले होते की, बर्मिंगम हे मोस्ट हॉंटेड ठिकाण आहे. त्यामुळे सगळ्यांचीच घाबरगुंडी झाली होती.

- Advertisement -

त्यानंतर सिद्धार्थही खूप घाबरला होता. सुरुवातीला सिद्धार्थ त्याच्या खोलीत गेल्यावर मऊमऊ बिछान्यावर उड्या मारायचा, लोळायचा, मात्र अंकुशचा अनुभव ऐकल्यानंतर तो चुपचाप खोलीत जायचा आणि सगळ्या फोटोंना नमस्कार करून सांगायचा. राजांनो मी तुमच्या खोलीचा नीट वापर करत आहे. आहे तशीच टापटीप ठेवत आहे. मला त्रास देऊ नका. सगळेच जण इतके घाबरले होते की, कोणीही त्या खोल्यांमध्ये एकटे जायचे नाहीत. एखाद्याला सोबत घेऊनच जायचे.


हे ही वाचा – ‘लोच्या झाला रे’ सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -