घरताज्या घडामोडी'वाईन म्हणजे दारु नव्हे' विक्री वाढली तर शेतकऱ्यांना फायदा होईल, संजय राऊतांचे...

‘वाईन म्हणजे दारु नव्हे’ विक्री वाढली तर शेतकऱ्यांना फायदा होईल, संजय राऊतांचे वक्तव्य

Subscribe

शेतकऱ्याच्या शेतात आलेल्या शेतमालातून वाईनची निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे वाईन विक्रीला जे विरोध करत आहेत ते शेतकरी विरोधी असल्याचे संजय राऊत म्हणाले.

राज्य सरकारने मंत्रिंडळात सुपरमार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. सुपरमार्केटमध्ये वाईन विकण्याची परवानगी दिल्यामुळे भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. महाराष्ट्राल मद्यराष्ट्र बनवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मात्र वाईन म्हणजे दारु नाही असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. राज्यात वाईनची विक्री वाढली तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असे संजय राऊतांनी म्हटलं आहे. तसेच भाजप नेते फक्त विरोध करतात ते शेतकऱ्यांसाठी काहीही करु शकत नाहीत असा पलटवार संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर टीकास्त्र डागलं आहे. राज्य सरकारच्या वाईन विकण्याच्या निर्णयाला विरोधी पक्षाने विरोध केला आहे. महाराष्ट्रात घरोघरी मद्य पोहचवण्याचा प्रकार असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे. यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत म्हणाले की, वाइन म्हणजे दारू नाही. वाईनची विक्री वाढली तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हे केले आहे. भाजप फक्त विरोध करते पण शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअरमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

भाजप शेतकरी विरोधी

राज्य सरकारने वाईन सुपरमार्केटमध्ये विक्री करण्यास परवानगी दिली आहे. शेतकऱ्याच्या शेतात आलेल्या शेतमालातून वाईनची निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे वाईन विक्रीला जे विरोध करत आहेत ते शेतकरी विरोधी असल्याचे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

कुठे मिळणार वाईन?

राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. परंतु सर्वच दुकानांमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी नाही. ज्या सुपरमार्केटचे आकारमान १ हजारपेक्षा जास्त आहे. अशा सुपरमार्केट आणि वॉक इन स्टोअरमध्ये वाईनची विक्री करण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.


हेही वाचा : विधान परिषदेच्या १२ आमदारांची फाईल राज्यपालांनी दाबणे हेच ‘डेंजर टू डेमोक्रसी’- संजय राऊत

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -