घरमनोरंजन‘पूर्णिमा श्रेष्ठ’ यांचा सांगीतिक प्रवास उलगडणार

‘पूर्णिमा श्रेष्ठ’ यांचा सांगीतिक प्रवास उलगडणार

Subscribe

‘सुषमा श्रेष्ठ ते पूर्णिमा श्रेष्ठ’ या सदाबहार गाण्यांची सांगीतिक मैफिल एका नव्या संकल्पनेसह येत्या रविवारी १७ फेब्रुवारीला रात्रौ ८.०० वाजता रवींद्र नाट्य मंदिर, येथे रंगणार आहे.

आपल्या सुमधुर सुरांनी हिंदी, मराठी, नेपाळी तसेच भारतातील विविध भाषांमधल्या असंख्य गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या बॉलीवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका पूर्णिमा श्रेष्ठ यांची अनोखी सांगीतिक मैफिल अनुभवण्याची संधी मुंबईकर रसिकांना मिळणार आहे. कॅन्सरपीडितांना निधी सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘पीपल्स आर्टस् सेंटर’, मुंबई यांच्यातर्फे १०२४ व्या सांगीतिक मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘माय जर्नी’ – ‘सुषमा श्रेष्ठ ते पूर्णिमा श्रेष्ठ’ या सदाबहार गाण्यांची सांगीतिक मैफिल एका नव्या संकल्पनेसह येत्या रविवारी १७ फेब्रुवारीला रात्रौ ८.०० वाजता रवींद्र नाट्य मंदिर, येथे रंगणार आहे.

कोण आहेत पूर्णिमा श्रेष्ठ

‘अंदाज’ या चित्रपटाद्वारे बालगायिका म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या ‘पूर्णिमा’ यांचा गायकीचा प्रवास बराच मोठा आहे.‘तेरा मुझसे है पहले’, ‘क्या हुआ तेरा वादा’ ‘है ना बोलो बोलो’ या जुन्या श्रवणीय गाण्यांसोबतच ‘सोना कितना सोना है’, ‘चने के खेत मैं’ ‘तूतु तू तूतु तारा’ ‘टन टना टन’, ‘मि.लोवा लोवा’ यासारख्या वेगळ्या बाजाच्या गाण्यांना त्यांचा स्वर लाभला. ‘पीपल्स आर्टस् सेंटर’च्या पुढाकाराने होणाऱ्या या मैफिलीत पूर्णिमा श्रेष्ठ त्यांचा आजवरचा सांगीतिक प्रवास उलगडणार आहेत. या मैफिलीचे संगीत संयोजन राज शर्मा करणार असून पूर्णिमा श्रेष्ठ यांच्यासोबत अवी दत्त हे पार्श्वगायन करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -