दीपिका परिधान करणार १ कोटीचे दागिने

बॉलीवूडमधील सध्याचं हॉट कपल असलेली रणवीर आणि दीपिकाचा विवाह सोहळा येत्या १४ नोव्हेंबरला होणार असून लग्नात दीपिका १ कोटीचे दागिने परिधान करणार आहे.

Deepika Padukone Ranveer singh
दीपिका - रणवीर लग्नाच्या बेडीत

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे बॉलीवूडमधील सध्याचं हॉट कपल असून त्यांचा येत्या १४ आणि १५ नोव्हेंबरला इटलीतील ‘लेक कोमो’ येथे लग्न सोहळा पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या तयारीची चर्चा सुरु होती. मात्र आता दीपिका किती तोळ्याचे आणि किती लाखाचे दागिने घालणार याची चर्चा सुरु झाली आहे. दीपिकानं तिच्या लग्नासाठी अंधेरी येथून १ कोटीचे दागिने खरेदी केले असून तिचे मंगळसूत्र २० लाख रुपयाचे असल्याचं समजतं आहे.

हे आहेत कोटी रुपयांचे दागिने

दीपिका लग्नात १ कोटी रुपयांचे दागिने परिधान करणार आहे. यामध्ये ती २० लाखांचे मंगळसूत्र, एक छोटा आणि मोठा नेकलेसचा समावेश आहे. याशिवाय, दीपिकानं काही भारतीय पारंपारिक दागिने देखील खरेदी केले आहेत. तर रणवीर सिंहकरता तिने २०० ग्रॅम सोन्याची चैन देखील खरेदी केली आहे.

बेंगळुरु इथंही होणार स्वागत सोहळा

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण विवाह सोहळा संपन्न झाल्यावर भारतात परतणार असून मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये त्यांचा स्वागत समारंभ पार पडणार आहे. त्यानंतर दीपिकाच्या नातेवाईकांसाठी खास बेंगळुरु इथंही स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


संबंधित बातम्या –

वाचा – दीपिका-रणवीरचा ‘गिफ्ट’ला नकार; म्हणाले…

वाचा – दीपिका-रणवीरने शाही लग्नसोहळ्याचा विमा उतरवला

पहा – दीपिका – रणवीरचं ग्रँड रिसेप्शन २८ नोव्हेंबरला