घरमनोरंजननिवडणुकांच्या रिंगणात जाण्याची अजिबात इच्छा नाही - सोनाली कुलकर्णी

निवडणुकांच्या रिंगणात जाण्याची अजिबात इच्छा नाही – सोनाली कुलकर्णी

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात बऱ्यापैकी अभिनेते असले तरी मला निवडणुकीच्या रिंगणात जायची इच्छा नाही

सामान्य माणसांसह मराठी सेलिब्रिटीं ही आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील मतदानाचा आज हक्क बजावला आहे. सोनालीसह तिच्या परिवाराने निगडी येथील ज्ञानप्रबोधिनीमध्ये मतदान केले. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात बऱ्यापैकी अभिनेते असले तरी मला निवडणुकीच्या रिंगणात जायची इच्छा नाही. मला एक सामान्य नागरिक म्हणूनच राहायला आवडेल, असे सोनाली कुलकर्णी हिने आपलं मत व्यक्त केलं आहे.

परिवर्तन नक्कीच घडेल

पिंपरी चिंचवडकर मोठ्या उत्साहात मतदान करत असल्याने मावळ लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल. तसेच परिवर्तन होण्यासाठी काही वर्षे लागतील. परंतु परिवर्तन नक्कीच घडेल. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. मतदानाची टक्केवारी वाढली असून ही परिवर्तनाची चाहूल आहे, असे देखील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सांगितले.

- Advertisement -

पिंपरी-चिंचवडकर असल्याचा अभिमान

पुणे पेक्षा पिंपरी-चिंचवड शहरात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मी पिंपरी-चिंचवडकर असल्याचा अभिमान आहे. यावेळी, राजकारणात येण्यास आवडेल का असा प्रश्न विचारला असता राजकारणात येण्यास मला अजिबात आवडणार नाही, आता सुखाने झोप येते, आनंदी जीवन जगत आहे, असे सोनालीने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -