घरताज्या घडामोडीWhat's Next म्हणत सोनू सूदने शेअर केलं नव्या सिनेमाचं पोस्टर

What’s Next म्हणत सोनू सूदने शेअर केलं नव्या सिनेमाचं पोस्टर

Subscribe

सोनूचा नवा सिनेमा हा अंतराळ किंवा एखाद्या सायन्स मिशनवर आधारीत असणार

अभिनेता सोनू सूद त्यांच्या सामाजिक कार्यामुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. मात्र सोनू आता त्याच्या नव्या प्रोजेक्टमुळे चर्चेत आला. ‘व्हाट्स नेक्स्ट’ असे म्हणत सोनूने त्याच्या नवीन सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. ‘व्हाट्स नेक्स्ट’ या नव्या सिनेमाचे पोस्टर शेअर करत ‘Unveiling a new mission?’ असे कॅप्शन देखील सोनूने दिले आहे.  पोस्टर पाहून सोनूच्या चाहत्यांची नव्या सिनेमा विषयीची प्रतिक्षा वाढली आहे. पोस्टर पाहून सोनूचे चाहते त्याचा नवा सिनेमा पाहण्यासाठी उत्साही असल्याचे दिसून आले आहे. सोनूने मात्र सिनेमाविषयी काहीही सांगितलेले नाही. सोनू नेमका कोणत्या मिशनवर निघाला आहे. हे येत्या काळात कळणार आहे.

व्हॉट्स नेक्स्ट सिनेमाच्या पोस्टरमध्ये सोनूच्या चेहऱ्यावर लहान लहान बाइनरी भाषेतील शब्द दिसत आहेत. ही एक प्रकारची कोड लँन्गव्हेज आहे. सिनेमाच्या पोस्टरवरुन सोनूचा नवा सिनेमा हा अंतराळ किंवा एखाद्या सायन्स मिशनवर आधारीत असणार आहे असे लक्षात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

- Advertisement -

सोनू सूदच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचे झाले तर आगामी काळात सोनूचे दोन महत्त्वाचे सिनेमे प्रेक्षकांना पाहता येणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या पृथ्वीराज या सिनेमात सोनू महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. खिलाडी अक्षय कुमार आणि मिस युनिव्हर्स मानुषी छिल्लर सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. ऐतिहासिक काळात घेऊन जाणारा हा सिनेमा यशराज फिल्मच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. पृथ्वीराज सिनेमासोबतच सोनू सूद शिव आचार्य या सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

सोनू सूद सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. कोरोना काळात सोनूने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहचला. त्याने अनेकांना मदत केली. इंन्स्टाग्रामवर सोनूचे १४ मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत.

 


हेही वाचा – राउडी राठोड २ मधून पुन्हा एकदा अक्षय कुमारचा जलवा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -