घरमनोरंजनपहिला मान अभिजितला

पहिला मान अभिजितला

Subscribe

कुठल्या मुला-मुलीने नाटकात काही करण्याची इच्छा दर्शवली की सर्वप्रथम त्यांना त्यांच्या घरातून विरोध होतो. एकंदरीत बाहेरची परिस्थिती लक्षात घेतली तर स्पर्धा ही वाढलेली आहे. यामुळे विरोध होणे साहजिकच आहे. म्हणून युवक-युवती नाटकात धडपड करत नाहीत असे नाही. आई-वडिलांचा डोळा चुकवून ही बरीचशी मुले एकांकिका चळवळीत सहभागी होत असतात. यातसुद्धा सहभागी कलाकारांच्या दोन वृत्ती पहायला मिळत असतात. एक गट आहे जो झटपट स्टार होण्याच्या मागे असतो तर दुसरा गट हा छोट्यामोठ्या जबाबदार्‍या पार पाडत मुख्य प्रवाहात सहभागी होऊन आपला उद्देश साधत असतो. नाटकातील तांत्रिक बाजू हे काही मुलींचे क्षेत्र नाही पण मुली लेखन, दिग्दर्शन, प्रकाश योजना या गोष्टी हाताळायला लागलेल्या आहेत. रंगभूमीला आवश्यक अशा गोष्टी या जिज्ञासू मुला-मुलींकडून होत आहेत. 27 मार्च जागतिक रंगभूमी दिनाचे निमित्त घेऊन मस्त मराठी कट्टा सुरू केलेला आहे. चळवळीतून यशस्वी झालेल्या सच्चा रंगकर्मीची यात मुलाखत घेतली गेलेली आहे. हा पहिला मान अभिनेता, दिग्दर्शक अभिजित झुंझारराव याला प्राप्त झालेला आहे.

जिथे मानववस्ती तिथे नाटक आहे. जगभरातील नाट्य चळवळ लक्षात घेतली तर महाराष्ट्रातली नाट्य चळवळ महत्त्वाची मानली जाते. परंतु इतर देशात नाट्यकलेच्या संदर्भात जो दस्ताऐवज पहायला मिळतो, तो भारतात फारसा उपलब्ध नाही. नव्या रंगकर्मींनी केलेले काम चित्रीकरणाच्या माध्यमातून संग्रही व्हावे अशा काहीशा हेतूने तरुण मुले-मुली एकत्र आलेली आहेत. मस्त मराठी कट्टा या नावाने युवकांमध्ये होणार्‍या नाट्य चळवळीचे दर्शन यू-ट्यूब चॅनलच्या माध्यमातून घडवण्याचे या मुलांनी ठरवलेले आहे. अनघा पेंडसे, अश्विनी माने यांनी आपल्या टीमसोबत या चळवळीला चालना देण्याचे ठरवलेले आहे. आकाशवाणी निवेदिका, अभिनेत्री, मुलाखतकार म्हणून जिची ओळख आहे त्या शुभांगी भुजबळने अभिजित झुंझाररावची ही विशेष मुलाखत घेतलेली आहे. प्रत्येक दिग्दर्शक, अभिनेता त्यांच्या कलाकारकिर्दीचा मागोवा घेताना सुरुवातीच्या प्रवासात रंगभूमीसाठी केलेल्या कार्याचा आढावा या मुलाखतीतून घेतला जाणार आहे. अभिजित हा नाटक, चित्रपट, मालिकांतून दिसला असला तरी एकांकिका आणि नाटक यासाठी त्याने केलेली धावपळ ही अनेक नवकलाकारांना प्रेरणा देणारी ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -