घरक्रीडाकसोटी क्रिकेटमध्येही फ्री-हिट ठेवा !

कसोटी क्रिकेटमध्येही फ्री-हिट ठेवा !

Subscribe

इंग्लंडमधील प्रचलित मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) जागतिक क्रिकेट समितीची काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथे बैठक झाली. यामध्ये कसोटी क्रिकेटला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी काय करता येईल यावरही चर्चा झाली. लोकांनी कसोटी क्रिकेट पाहावे यासाठी एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटप्रमाणेच कसोटीतही फ्री-हिट तसेच टायमरचा वापर करण्यात यावा असा सल्ला एमसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) दिला आहे. त्याचप्रमाणे काही महिन्यांत सुरु होणार्‍या विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्व देशांत एकाच कंपनीचा चेंडू वापरण्यात यावा असाही सल्ला एमसीसीने दिला आहे.

एमसीसीने केलेल्या सर्व्हेनुसार धीम्या ओव्हररेटमुळेही प्रेक्षक कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवत असल्याचे निदर्शनास आले. फिरकीपटूंचा वापर ज्या देशांमध्ये कमी होतो, असा देशांमध्ये बर्‍याच सामन्यांत दिवसातील ९० षटके पूर्ण करण्यासाठी अर्धातास खेळ वाढवावा लागतो.

- Advertisement -

त्यामुळे ९० षटके वेळेतच पूर्ण व्हावीत यासाठी टायमरचा वापर करण्यात यावा असा सल्ला एमसीसीने दिला आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये नो-बॉलचेही प्रमाण जास्त असल्याने ते कमी करण्यासाठी फ्री-हिट उपयुक्त ठरेल असे एमसीसीचे मत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -