घरमनोरंजनसुहाना खान Maybelline ची ब्रँड Ambassador

सुहाना खान Maybelline ची ब्रँड Ambassador

Subscribe

या ब्रँडचा नवा चेहरा म्हणून सुहानाची निवड करण्यात आली. याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकर अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. मात्र, यापूर्वीच सुहानाला मोठ्या ब्रँडसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. नुकतीच याबाबत बातमी समोर आली असून सुहाना खानला प्रसिद्ध न्यूयॉर्कस्थित ब्यूटी ब्रँड मेबेलिन (Maybelline) ची ब्रँड अम्बेसिटर बनवण्यात आलं आहे.

नुकताच मेबेलिनचा एक इवेंट पार पडला जिथे सुहानाच्या लूक आणि स्माईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या ब्रँडचा नवा चेहरा म्हणून सुहानाची निवड करण्यात आली. याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

या कार्यक्रमात सुहानाने लाल पँटसह क्रॉप जॅकेट परिधान केली होते. ब्युटी ब्रँडचा नवा चेहरा बनल्याबद्दल तिने आनंदही व्यक्त केला. अनेकजण सुहाना खानला बॉलिवूडची दुसरी दीपिका पदुकोण म्हणत आहेत.

या चित्रपटातून सुहाना करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

आगामी काळात सुहाना दिग्दर्दक झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटातून श्रीदेवीची दुसरी मुलगी खुशी कपूर देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शिवाय अमिताभ बच्चन यांचा नातू देखील या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘भोला’ चित्रपट पाहून आल्यावर पती-पत्नीमध्ये झालं कडाक्याचं भांडण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -