घरअर्थजगतKeshub Mahindra Passed Away : महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा कालवश,...

Keshub Mahindra Passed Away : महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा कालवश, ९९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Subscribe

महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे आज (ता. 12 एप्रिल) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ९९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Keshub Mahindra Passed Away : महिंद्रा समूहाचे माजी अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे आज (ता. 12 एप्रिल) निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या 99व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फोर्ब्सने काही दिवसांपूर्वी सादर केलेल्या अब्जाधीश लोकांच्या यादीत केशब महिंद्रा यांच्या देखील नावाचा समावेश होता. त्यांच्या निधनाची माहिती इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड आॅथोरायझेशन सेंटरचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली.

केशब महिंद्रा यांनी 48 वर्ष महिंद्रा समूहाचा अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला. त्यानंतर त्यांनी 2012 मध्ये अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. केशब महिंद्रा यांच्या पश्चात आता सुमारे $1.2 अब्ज संपत्ती असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

केशब महिंद्रा यांनी डेथ पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर ते 1947 मध्ये महिंद्रा समुहामध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर 1963 मध्ये त्यांनी या समुहाच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. त्यांच्या नेतृत्वाखाली महिंद्रा समूहाने नवीन उंची गाठली आणि त्यानंतर 48 वर्षांच्या सेवेनंतर सन 2012 मध्ये त्यांनी महिंद्राचे अध्यक्षपद त्यांचे पुतणे आनंद महिंद्रा यांच्याकडे सोपवले. यासोबतच त्यांनी टाटा स्टील, सेल, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स अशा अनेक कंपन्यांमध्ये बोर्ड स्तरावर काम केले होते.

त्यांच्या जवळपास 5 दशकांच्या दीर्घ कार्यकाळात केशब महिंद्रा यांनी महिंद्रा समूहाची केवळ देशातच नव्हे तर जगभरात एक मोठी कंपनी आणि एक मोठा समूह म्हणून नावलौकीक कमावला. कामासाठी आणि मालवाहतुकीसाठी वाहने तयार करण्याच्या क्षेत्रात त्यांनी कंपनीची एक नवी ओळख निर्माण केली. आजच्या काळात, Mahindra & Mahindra हे त्यांच्या ट्रॅक्टर, SUV केसेस तसेच हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील सेवांसाठी देखील ओळखले जाते. 1987 मध्ये, व्यवसाय जगतात त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना फ्रेंच सरकारने सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला होता. याशिवाय केशब महिंद्रा यांना अर्न्स्ट आणि यंग हा जीवनगौरव पुरस्कार 2007 साली प्रदान करण्यात आला होता.

- Advertisement -

हेही वाचा – ED आरोपपत्रातून अजित पवारांचे नाव वगळले; महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा आहे तरी काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -