घरताज्या घडामोडीसनी लिओनीचा BA ला प्रवेश; बेबी डॉल म्हणते कॉलेजमध्ये भेटू

सनी लिओनीचा BA ला प्रवेश; बेबी डॉल म्हणते कॉलेजमध्ये भेटू

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमी तिच्या बोल्ड किंवा हॉट फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. पण सध्या सनी वेगळ्याचे कारणामुळे चर्चेत आली आहे. याबाबत तिने ट्विट करत चाहत्यांना एक आश्चर्यकारक धक्काच दिला. कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये सनी लिओनीने टॉप केले असल्याचे समोर आले आहे. कोलकाताच्या आशुतोष कॉलजेमध्ये (Sunny Leone Ashutosh College) सनीने टॉप केले आहे. सनीने यासंदर्भात स्वतः ट्विट (Sunny Leone tweets today) केले आहे. तिने लिहिले आहे की, ‘आता तुम्हा सर्व जणांना कॉलेजमधील नवीन सेमिस्टरला भेटेन. तुम्ही माझ्या क्लासमध्ये असाल अशी मला आशा आहे.’

- Advertisement -

गुरुवारी आशुतोष कॉलेजने बीए ऑनर्स, इंग्रजी (BA Honours, English) प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर केली. या यादीत सनी लिओनीचे नाव अव्वल स्थानावर होते. कॉलेजच्या वेबसाईटवर ही यादी प्रसिद्ध झाली असून सर्वजण ही यादी पाहून आश्चर्यचकीत झाले. सध्या आशुतोष कॉलेजची (Asutosh College) ही यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॉलेजच्या अधिकाऱ्याने या यादीतील चूक कबूल करून स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते, ‘एखाद्याने जाणूनबुजून सनी लिओनीच्या नावाने अर्ज दाखल केला, जो तपासणी न करता पुढे गेला. आम्ही संबंधित विभागाला दुरुस्त करण्यास सांगितले आहे. तसेच या घटने संदर्भात चौकशी केली जाईल.’

- Advertisement -

या जारी केलेल्या यादीनुसार, सनी लिओनीचा Application आयडी ९५१३००८७०४ आणि रोल नंबर २०७७७७६६६६ असा दाखवला आहे. तसेच २०२० मध्ये बारावी पास झाल्याचे दाखवले आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सनीला १२ वीच्या बोर्ड परीक्षेत सर्व विषयांमध्ये (बेस्ट ऑफ फोर) १०० पैकी १०० गुण मिळाल्याचे दाखविले गेले आहे.

सनी लिओन सध्या तिच्या कुटुंबासोबत अमेरिकेत राहत आहे. सोशल मीडियावरुन ती भारतातील प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून असते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने मराठमोळ्या अंदाजात गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

 


हेही वाचा – बबड्याच्या हट्टापायी दहा लाख विद्यार्थांना त्रास; आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -