घरताज्या घडामोडीAmol Kolhe यांच्या 'व्हाय आय किल्ड गांधी' सिनेमाचे प्रदर्शन रोखण्याच्या याचिकेवर...

Amol Kolhe यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ सिनेमाचे प्रदर्शन रोखण्याच्या याचिकेवर सुनावणीस SCचा नकार

Subscribe

सिनेमात नथुरामाचे उदात्तीकरण केले जात असून यातून सामाजिक द्वेष पसरवला जात असून सेन्सॉरचे प्रमाणपत्र नसताना लाइम लाइट नावाच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. याच संदर्भात त्यांनी याचिका सादर करून सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने या संपूर्ण प्रकरणावर हस्तक्षेप करण्यास पूर्णपणे नकार दिला आहे.

अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe)  यांच्या व्हाय आय किल्ड गांधी (Why I Killed Gandhi)  या सिनेमावरुन मागील काही दिवसांपासून चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. सिनेमात डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुरामाची (Nathuram Godse)  भूमिका साकारली असून सिनेमातून नथुरामाचे उदात्तीकरण केल्याचा आरोप करण्यात आला. व्हाय आय किल्ड गांधी हा सिनेमा 30 जानेवारी रोजी लाइम लाइट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाचे हे प्रदर्शन रोखण्यासाठी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.मात्र या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून याचिकाकर्त्यांचे मुलभूत अधिकारी प्रभावित होत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मत असून याचिकाकर्ते यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करू शकतात असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

व्हाय आय किल्ड गांधी या सिनेमात डॉ. अमोल कोल्हे यांनी नथुरामाची भूमिका साकारली असून नथुरामाचे उदात्तीकरण करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सिंकदर बहेल यांनी सर्वोच्च न्यायालयात सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्यात यावे यासाठी याचिका दाखल केली होती. या सिनेमात नथुरामाचे उदात्तीकरण केले जात असून यातून सामाजिक द्वेष पसरवला जात असून सेन्सॉरचे प्रमाणपत्र नसताना लाइम लाइट नावाच्या ओटीटी प्लॅटफॉर्म सिनेमा प्रदर्शित करण्यात आला आहे. याच संदर्भात त्यांनी याचिका सादर करून सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाने या संपूर्ण प्रकरणावर हस्तक्षेप करण्यास पूर्णपणे नकार दिला आहे. त्यामुळे आता याचिकेकर्ते यासंदर्भात हाय कोर्टात जाणार का हे पाहणे महत्त्वाचे आहे.

- Advertisement -

 अमोल कोल्हेंचा यू-टर्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल आळंदीत एका कार्यक्रमादरम्यान आत्मक्लेश व्यक्त केला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आळंदी येथील इंद्रायणी घाटावरील महात्मा गांधी यांच्या स्मारकाला खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट देत आदरांजली वाहिली. याचवेळी नथुराम गोडसे यांच्या भूमिकेबाबत आत्मक्लेश करत भावना दुखावलेल्यांप्रती दिलगिरी व्यक्त केली आहे.  Amol Kolhe : अमोल कोल्हेंचा यू-टर्न; आता नथुराम गोडसेंच्या भूमिकेवरून केला आत्मक्लेश


हेही वाचा – डॉ. अमोल कोल्हे यांनी कलाकार म्हणून नथुरामाची भूमिका केली, शरद पवारांकडून कोल्हेंची पाठराखण

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -