घरताज्या घडामोडीBan on Physical Rallies: निवडणूक रॅली, रोड शोवर ११ फेब्रुवारीपर्यंत निर्बंध कायम,...

Ban on Physical Rallies: निवडणूक रॅली, रोड शोवर ११ फेब्रुवारीपर्यंत निर्बंध कायम, राष्ट्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

Subscribe

राष्ट्रीय निवडणूक आयोगाने गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यामुळे, 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु आहे. या राज्यात प्रत्यक्ष प्रचार, निवडणूक रॅली आणि रोड शोवर बंदी घालण्यात आली होती. राष्ट्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी कोरोना परिस्थितीचा आढावा बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये राष्ट्रीय निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी राज्यांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. सध्याचे निर्बंध 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय निवडणूक आयुक्तांनी घेतला आहे. राष्ट्रीय निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत संबंधित राज्यांतील राज्य निवडणूक आयुक्तही उपस्थित होते.

विधानसभा निवडणूक असणाऱ्या राज्यातील कोरोना परिस्थितीचा राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडून आठवड्याला आढावा घेण्यात येत आहे. कोरोनाच्या परिस्थितीदरम्यान निवडणूक घेण्यात येत असल्यामुळे मतदारांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. यापू्र्वी 22 जानेवारी रोजी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती. या बैठकीमध्येही रॅलीवरील निर्बंध, रोड शोवरील बंदी कायम ठेवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. 31 जानेवारीपर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात आले होते.

- Advertisement -

राष्ट्रीय निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपत आल्यामुळे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने पुन्हा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये निवडणूक आयोगाने जास्तीत जास्त 1000 लोकांच्या क्षमतेच्या भौतिक रॅलींना परवानगी दिली आहे. तर जास्तीत जास्त 500 लोकांची क्षमता असलेल्या इनडोअर मीटिंग्ज. घरोघरी प्रचारासाठी वीस जणांना परवानगी दिली आहे. यापूर्वी 22 जानेवारीला राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या प्रत्यक्ष बैठकीला परवानगी दिली होती.

- Advertisement -

राष्ट्रीय निवडणूक आयोगाने गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केल्यामुळे, 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.


हेही वाचा : Rail Budget 2022 : यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी असणार ‘या’ खास गोष्टी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -