Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग आयकर विभागाने अभिनेता सोनू सूदच्या घरासह संबंधित ६ ठिकाणी केले 'सर्वेक्षण'

आयकर विभागाने अभिनेता सोनू सूदच्या घरासह संबंधित ६ ठिकाणी केले ‘सर्वेक्षण’

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडमधून (bollywood) एक महत्वाची बातमी समोर येत आहे. अभिनेता सोनू सूदच्या(sonu sood) घरासह संबधित सहा ठिकाणी आयकर विभागाचं (surveyed by income tax department at sonu sood house)सर्वेक्षण सूरु असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.आयकर विभागाची टीम सोनूच्या मुंबईतील घरापर्यंत पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाच्या टीमने सोनूच्या घराचे ‘सर्वेक्षण’ केले आहे. आयटी विभाग मुंबईत अभिनेता सोनू सूदच्या 6 कॅम्पसमध्ये सर्वेक्षण मोहीम राबवत आहे.

कोरोना व्हायरस सारख्या महामारीच्या काळात, सोनू सूदने लोकांना मदत करून प्रसारमाध्यमे आणि सामान्य लोकांकडून खूप प्रशंसा मिळवली आहे. कोरोना महामारी दरम्यान, सोनूने मोठ्या संख्येने स्थलांतरित मजुरांना आर्थिक मदत केली होती. अशा मजुरांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी त्यांनी जेवण, वाहने इत्यादींची व्यवस्था केली होती.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच सोनूला दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनवल्यात आले होते. तसेच यादरम्यान सोनूने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात घोषणा करण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सोनूने स्पष्टपणे सांगितले होते की, त्यांचा राजकारणात येण्याचा सध्या  कोणताही विचार नाहीये.

48 वर्षीय सोनू हिंदी, तेलगू, कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम करत आहे. लवकरच तो पृथ्वीराज या पीरियड ड्रामामध्ये दिसणार आहे. याशिवाय तो तेलुगू अॅक्शन-ड्रामा आचार्यमध्येही काम करत आहे. सप्टेंबर 2020 मध्ये, सूदला कोरोना महामारी दरम्यान मानवतावादी कार्यासाठी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) द्वारे 2020 SDG विशेष मानवतावादी कृती पुरस्कार देण्यात आला.


- Advertisement -

हे हि वाचा –  Boycott pavitra rishta 2 म्हणणाऱ्या ट्रोलर्सला अंकिताने दिलं परखड उत्तर

- Advertisement -