घरमनोरंजन'त्या' टी-शर्टवरून Flipkart वर संतापले सुशांत सिंहचे चाहते

‘त्या’ टी-शर्टवरून Flipkart वर संतापले सुशांत सिंहचे चाहते

Subscribe

फ्लिपकार्ट कंपनीने केलेल्या एका टी-शर्टच्या जाहिरातीमध्ये सुशांत सिंहचा फोटो लावल्यामुळे चाहते फ्लिपकार्ट कंपनीवर संतापले आहेत.

हिंदी टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. सुशांतच्या मृत्यूनंतरही त्याचे चाहते त्याची वारंवार आठवण काढतात. त्यामुळेच सुशांतबाबत कोणी दुर्व्यवहार केला तर त्याचे चाहते सहन करू शकत नाहीत. याचं दरम्यान ई-कॉमर्स फ्लिपकार्ट कंपनीने असं काही केलं आहे, ज्यानंतर सुशांत सिंह राजपूतचे चाहते संतापले आहेत.

टी-शर्टवर छापला सुशांतचा फोटो
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी या जगाचा निरोप घेतला. मात्र, आजही त्याचे चाहते त्याची आठवण काढत असतात. नुकत्याच फ्लिपकार्ट कंपनीने केलेल्या एका टी-शर्टच्या जाहिरातीमध्ये सुशांत सिंहचा फोटो लावल्यामुळे चाहते फ्लिपकार्ट कंपनीवर संतापले आहेत. त्यामुळे फ्लिपकार्ट कंपनीचा निषेध करत सुशांतच्या चाहत्यांनी ट्वीटर अकाऊंटवर फ्लिपकार्टवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

बायकॉट फ्लिपकार्ट असा ट्रेंड सध्या फ्लिपकार्टवर चालत आहे. खरंतर फ्लिपकार्ट कंपनीने टी-शर्टवर सुशांतचा फोटो लावला पण त्या फोटोखाली त्यांनी Depression like drowning असं लिहिलं आहे. हे पाहिल्यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी फ्लिपकार्टला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

- Advertisement -

फ्लिपकार्ट कंपनीवर तक्रार
सुशांत सिंहचे चाहते फक्त ट्वीटवरचं नव्हे तर कायदेशीर कारवाई सुद्धा करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या तक्रारीनंतर कंपनीला नोटिस सुद्धा पाठवण्यात आली आहे.


हेही वाचा :ज्या दिवशी मी लग्न करेन…’कॉफी विथ करण’मध्ये विजय देवरकोंडाने मांडलं लग्नाबाबत स्पष्ट मत

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -