घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या ट्विटचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही - दीपक केसरकर

मुख्यमंत्र्यांच्या ट्विटचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही – दीपक केसरकर

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या परंतु शुभेच्छा देताना माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेय, यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांच्या ट्विटचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही असे सांगितले आहे. माजी मुख्यमंत्री सर्व राज्यांचे असतात तसेच पक्षप्रमुख हे केवळ एका पक्षाचे असतात असे केसरकर यांनी म्हटले आहे.शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी केसरकरांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, माजी मुख्यमंत्री पुर्ण राज्याचे असतात आणि पक्ष प्रमुख हे एका पक्षाचे असतात त्यामुळे ते नेहमी वरती असतील याचा कोणताही वेगळा अर्थ कढण्याची गरज नाही. असे दीपक केसरकर म्हणाले.

- Advertisement -

शेवट गोड होण्यासाठी जागा मोकळी

शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये बदल करण्यात आले, यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख ही जागा खाली ठेवण्यात आली आहे. आम्ही पक्ष प्रमुखांची जागा मोकळी ठेवली आहे कोणासाठी जागा ठेवले हे तुम्हाला माहीत आहे. ती जागा घेऊन गोड सुरुवात होईल यासाठी जागा रिकामी ठेवण्यात आली असल्याचा दीपक केसरकर म्हणाले.

उद्धव ठाकरे यांची मुलाखत दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतली परंतु या मुलाखतीमध्ये चांगले प्रश्न विचारले असते तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिमा राज्यात वाढली असती परंतु त्यांनी तेच ते प्रश्न घेतल्यामुळे उद्धव ठाकरेंवर टीका होत आहे, असेही केसरकर म्हणाले.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर उद्या बोलणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिंदे गटावर अनेक घनाघाती टीका केल्या आहेत. मात्र यावर दीपक केसरकर यांनी उत्तर देण्यास टाळले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती बाबत प्रश्न विचारला असता दीपक केसरकर म्हणाले की, आज ठाकरेंचा वाढदिवस आहे त्यामुळे त्यांना आज नुसता शुभेच्छा देणार परंतु त्यांच्या मुलाखतीवर उद्या सविस्तर बोलणार असल्याचे, दीपक केसरकर यांनी सांगितले.


अडीच वर्षे ज्या आमदारांमुळे मंत्रीपद भूषवले, त्यांच्याबद्दल चुकीचा उल्लेख संस्कृतीला धरून नाही – केसरकर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -