घरमनोरंजनकुटुंबियांनी गंगा नदीत केले सुशांत सिंह राजपूतचे अस्थी विसर्जन

कुटुंबियांनी गंगा नदीत केले सुशांत सिंह राजपूतचे अस्थी विसर्जन

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने रविवारी, १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित केल्या आहेत. मूळचा बिहारमधील पटना येथे राहणाऱ्या सुशांतच्या वडिलांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते. तसेच सुशांतला तीन बहिणी आहेत. दरम्यान, गंगा नदीमध्ये त्याच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी सुशांतचे वडिल के. के. सिंह आणि त्याच्या बहिणी उपस्थित होत्या. बिहारमधील पुर्णियाच्या पैतृक गावातील लोकं तसेच नातेवाईक आल्यानंतर सुशांतचे श्राद्धांचे विधी त्याच्या राजीवनगर येथील घरामध्ये केले जाणार असल्याचे सांगितले जाते. याआधी सुशांतच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी त्यांच्या पटना येथील घरामध्ये पुजा ठेवण्यात आली होती.

- Advertisement -

सुशांतच्या अस्थी विसर्जनाची माहिती त्याची बहिण श्वेता सिंह कीर्ति यांनी सोशल मीडियावरून दिली. फेसबुकर पोस्ट करत त्यांनी सांगितले की, आम्ही काल पटना येथे पोहोचलो. सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्हाला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार. आज आम्ही भावाचे अस्थी विसर्जित करणार आहोत. सोमवारी मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत सुशांत सिंह राजपूतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. १४ जून रोजी सुशांतचा आत्महत्या केल्यामुळे मृत्यू झाला होता. सुशांतने काय पो छे, केदारनाथ, एम. एस. धोनी, पीके, छिछोरे सारख्या चित्रपटांमधून भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा –

मोबाईल लॅबमुळे आता खेड्या-पाड्यात होणार कोरोना चाचणी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -