घरताज्या घडामोडीSushant Sucide Case: रियाची फक्त चौकशी नको,अटक करा - शेखर सुमन

Sushant Sucide Case: रियाची फक्त चौकशी नको,अटक करा – शेखर सुमन

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पोलीसात तक्रार दाखल झाली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे ईडीमार्फत सध्या तिची चौकशी सूर आहे. आता अभिनेते शेखर सुमन यांनी रियाच्या अटकेची मागणी पोलिसांकडे केली आहे. त्यांनी संस्कृतमधील एक श्लोक पोस्ट करत रियाच्या अटकेची मागणी केली आहे.

- Advertisement -

काय आहे श्लोक

महर्षी वेदव्यास यांचा “त्रिया चरित्रं, पुरुषस्य भाग्यम, देवौ ना जानाति कुतो मनुष्य:” असा श्लोक शेखर सुमन यांनी पोस्ट केला आहे. या शोल्काच्या सुरूवातीला त्रिया या शब्दाच्या ऐवजी रिया असं लिहिलं आहे. स्त्रीचं चरित्र आणि पुरुषाचं भाग्य देवालाही ठावूक नसतं. असा या श्लोकाचा अर्थ आहे. या श्लोकाच्या माध्यमातून त्यांनी रिया चक्रवर्तीच्या अटकेची मागणी केली आहे. त्यांचं हे अनोखं ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

- Advertisement -

 

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. काल रियाने त्यांच्या युरोप टूरमध्ये काय घडलं ते सांगितलं. ऑक्टोबर २०१९ मध्ये मी सुशांत आणि माझा भाऊ शोविक चक्रवर्ती युरोप टूरला गेलो होतो. त्यावेळी आम्ही इटलीच्या फ्लोरेन्स शहरातील एका ६०० वर्षे जुन्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. या हॉटेल मध्ये मी आणि शोविक वेगळ्या रुम मध्ये राहिलो होतो तर सुशांत दुसऱ्या रुम मध्ये राहिला होता. काही कामा निमित्त मी आणि शौविक हॉटेल मधून बाहेर गेलो होतो. काही तासांनी आम्ही दोघे हॉटेलमध्ये परत आलो तेव्हा सुशांत हॉटेलच्या एका कोप-यात बसून रुद्राक्ष माळेचा जप करत होता. यावेळेस सुशांत खुप घाबरला होता. हे पाहून मी आणि शौविक ने सुशांतला हॉटेलमधल्या रुममध्ये नेलं आणि त्याची अशी अवस्था का झाली याबाबत त्याला विचारणा केली. तेव्हा सुशांतने सांगितलं, ज्या हॉटेल मध्ये हे आम्ही तिघे थांबलो होतो त्या हॉटेल मध्ये गोया नावाच्या एका प्रसिद्ध चित्रकाराची पेंटीग होती. ज्यात एक राक्षस एका मुलाला खात असल्याचे चित्र काढलं होतं. ती पेंटींग पाहून सुशांत खुप घाबरला होता.

८ जूनला झालं भांडण

सुशांत भूताच्या घटनेवरून सुशांत खुपच चिडचिड करू लागला होता. तो सतत माझ्याशी भांडायचा. ८ जूनला ही आमचे याच विषयावरून कडाक्याचं भांडण झालं. सुशांतनेच मला त्याच्या घरातून बाहेर पडायला सांगितलं. आणि मी माझी बॅग घेवून सुशांतच्या घरातून निघुन गेली. या सगळ्यामुळे मला ही खुप नैराश्य आले होते म्हणून मी देखील एका मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला. हा जवाब नोंदवत असताना रियाला रडू कोसळलं होतं.

ईडीकडून  दोनदा चौकशी

अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतच्या कुटुंबीयांनी अनेक आरोप केले आहेत. त्यामुळे दोन वेळा रियाची ईडीने चौकशी केली आहे. या चौकशीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा झाला असून तिचे फोन कॉल्स रेकॉर्डदेखील समोर आले आहेत. यात रियाने AU नामक व्यक्तीला सर्वाधिक वेळा फोन केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी AU हे नाव समोर आल्यावर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र AU ही रियाच्या जवळची व्यक्ती असल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -