घरमनोरंजनअसा आहे 'ठाकरे' चित्रपटाचा ट्रेलर

असा आहे ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर

Subscribe

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ठाकरे या चित्रपटाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला. या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतूरतेने वाट बघत होते. आज दुपार या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. यावेळी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे, चित्रपटाचे निर्माते संजय राऊत आणि चित्रपटात ठाकरे यांची भूमिका करणारा अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी उपस्थित होते. तर मीनाताईंची भुमिका अमृता राव साकारणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होणार की नाही याबाबत सांशकता होती. कारण चित्रपटातील काही संवाद आणि दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे.

काय आहे ट्रेलरमध्ये

या ट्रेलरमध्ये आपल्याला बाबरी मशिद प्रकरणानंतर उसळलेली दंगल बघायला मिळत आहे. शिवसेनेचा झंझावती प्रवास, बाळासाहेबांचे स्वतंत्र विचार, मराठी माणसाबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी, मुंबई, मुंबईतील कामगांरासाठी केलेली मदत, बाबरी मशिदीनंतर उसळलेली दंगल, सावलीसारखी सोबत राहणाऱ्या मांसाहेब यांचा प्रवास ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे.

- Advertisement -

नवाजच्या लूकची चर्चा

ठाकरे चित्रपटात प्रमुख भुमिकेत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आहे. ठाकरे चित्रपटाच्या पहिल्या पोस्टर लॉन्च नंतर नवाजच्या या लूकची खूप चर्चा झाली. या लूकमध्ये नवाज हूबेहूबे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा दिसतो. अनेकांना पहिल्या पोस्टरमध्ये खुद्द बाळासाहेब असल्याचा बास झाला होता. त्याच्यावर खूप मेहनत घेतली आहे. नवाजच्या लूकमुळेच या चित्रपटाच्या चर्चेला सुरूवात झाली. त्याचप्रमाणे ट्रेलरमध्ये नवाजुद्दीनने साकारलेले हूबेहूब बाळासाहेब प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -