घरमनोरंजनबॉलिवूडचा बाप आला... बेशर्म गाण्यातील शाहरुखच्या लूकवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

बॉलिवूडचा बाप आला… बेशर्म गाण्यातील शाहरुखच्या लूकवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.

- Advertisement -

नुकत्याच काही दिवसांपूर्वी ‘पठाण’ चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करण्यात आले होते. दरम्यान, आता लवकरच पठाण चित्रपटातील बेशर्म रंग गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे. याबाबत एक पोस्ट शेअर करत शाहरुखने त्याच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. शाहरुखने शेअर केलेल्या पोस्टमधील फोटो पठाण चित्रपटातील बेशर्म गाण्यामधील असून त्याने खाली कॅप्शनमध्ये, बोट्स…सुंदरता…आणि बेशर्म रंग… असं लिहिलं आहे. हे गाणं 12 डिसेंबर म्हणजे आज प्रदर्शित होईल. दरम्यान, शाहरुखचे चाहते चित्रपट पाहण्यासाठी आणखी उत्सुक झाले आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.” या पोस्टवर अनेकजण कमेंट्स देखील करु लागले आहेत.

‘डंकी’ आणि ‘जवान’मध्ये देखील दिसणार शाहरुख
शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटापूर्वी ‘पठाण’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘डंकी’ चित्रपटामध्ये शाहरुखसोबत अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असतील तर, ‘जवान’मध्ये शाहरुख खानसोबत अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत असेल.

- Advertisement -

 


हेही वाचा :

शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -