घरताज्या घडामोडीगट वगैरे आम्ही मानत नाही, जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना; संजय राऊतांचा शिंदेंवर...

गट वगैरे आम्ही मानत नाही, जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना; संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर आता पक्ष आणि पक्षचिन्ह नेमके कुणाचे असा पेच निर्माण झाला होता. याप्रकरणी आज, 12 डिसेंबरपासून केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या शिंदे गटावर हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले. त्यानंतर आता पक्ष आणि पक्षचिन्ह नेमके कुणाचे असा पेच निर्माण झाला होता. याप्रकरणी आज, 12 डिसेंबरपासून केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या शिंदे गटावर हल्लाबोल केला. तसेच, “गट वैगरे आम्ही मानत नाही. शिवसेना आणि शिंदे गट असे आहे. जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना. जिथे बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरंजीव त्यांची शिवसेना”, असे संजय राऊत यांनी सांगितले. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams Cm Eknath Shinde and Talk On hearing election commission shivsena election symbol)

खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊतांनी आजच्या सुनावणीवरून शिंदे गटावर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, “गट वैगरे आम्ही मानत नाही. शिवसेना आणि शिंदे गट असे आहे. जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना. जिथे बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरंजीव त्यांचीच शिवसेना. मागील काही काळात त्यांनी वेगळा गट आणि वेगळी निशाणी केली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सध्या सुरू आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात सुनावणी सुरू आहे”

- Advertisement -

पुढे राउत म्हणाले की, “आम्हाला खात्री आहे की, जरी दबाव असला एका विशिष्ट बाजून निर्णय घेण्याचा तरिही सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांची आणि महाराष्ट्राची पुण्याई वाया जाणार नाही. महाराष्ट्राची साडे अकरा कोटी जनता डोळ्यात प्राण आणून या निर्णयाकडे पाहत आहे. मग ‘धनुष्यबाण’ असेल, ‘शिवसेना’ हे नाव असेल. हे बाळासाहेब ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचे आहे. बाकी गट वैगरे आहेत, त्याबाबात राज्याची जनता आणि न्यायालय निर्णय घेईल. म्हणूनच मी सांगतो की, बाळासाहेब ठाकरेंचे आणि महाराष्ट्राचे पुण्य हे असेच कोणाला पळवून नेता येणार नाही”

त्यामुळे आज केंद्रीय निवडणूक आयोगात होणाऱ्या सुनावणीवेळी पक्ष आणि पक्षचिन्ह नेमके कुणाला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – …म्हणून त्यांना भिकेचे डोहाळे लागलेत; ‘सामना’तून चंद्रकांत पाटलांवर टीकास्र

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -