घरमनोरंजनविश्व मराठी परिषदेचे पहिले ऑनलाईन संमेलन जानेवारी २०२१ मध्ये पार पडणार

विश्व मराठी परिषदेचे पहिले ऑनलाईन संमेलन जानेवारी २०२१ मध्ये पार पडणार

Subscribe

बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २७ देशातील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी, २०२१ रोजी विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी ऑनलाईन संमेलन २०२१ पार पडणार आहे. यामध्ये एक दिवस स्वतंत्र विश्व मराठी युवा संमेलनही होणार आहे. या महासंमेलनाचे अध्यक्षपद अनिल काकोडकर यांच्याकडे सोपवण्यात आले असून नऊ सदस्यांचे अध्यक्ष मंडळ येथे असणार आहे. तब्बल २५ देशांतून २५ स्वागताध्यक्ष असणार असून सुमित्रा महाजन या महास्वागताध्यक्ष असणार आहेत. तर अमेरिकेतील बीएमएमच्या अध्यक्षा विद्या जोशी महासंरक्षक असणार आहेत. जगभरातील ३२ देशातून, अमेरिकेतून ५० राज्यातील, भारतातील १२ राज्यातील आणि १५० हून अधिक संस्था, ५०० हून अधिक वाचनालये आणि १००० हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग या संमेलनात पाहायला मिळणार असून विशेष म्हणजे यासाठी मोफत प्रवेश दिला जाणार आहे. संमेलनात सहभागी होण्याकरता नोंदणी आवश्यक असून प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

आत्तापर्यंत २५ देशातील (अमेरिका, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, युगांडा, झांबिया, नायजेरिया इ.) महाराष्ट्र मंडळांनी संमेलनासाठी आपला सहयोग दर्शविण्यासंबंधी लेखी पत्रे दिली आहेत. “बृहन महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका” ही अमेरिकेतील ६० संमेलनासाठी विशेष संकेतस्थळ तयार करण्यात येत असून त्यावर संमेलनाची विस्तृत माहिती उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. देश, विदेशातील मराठी बांधवांनी संमेलनासाठी प्रतिनिधी म्हणून नि:शुल्क नोंदणी करण्यासाठी https://www.sammelan.vmparishad.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विश्व मराठी परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे. देश विदेशातील मराठी भाषिकांनी या संमेलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन विश्व मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले आणि संस्थापक संचालक अनिल कुलकर्णी यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Bigg Boss Controversy: कलर्सचा मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत तर राज ठाकरेंना मराठीत माफीनामा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -