घरमनोरंजनअजाणवर भाष्य करणारा 'भोंगा' चित्रपट लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला

अजाणवर भाष्य करणारा ‘भोंगा’ चित्रपट लवकरंच प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

खरंतर ध्वनी प्रदूषण कमी करण्यावर या चित्रपटात जोर दिला असून या पार्श्वभूमीवर 'भोंगा' हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. 'भोंगा धार्मिक नाही तर सामाजिक समस्या आहे' हा आशयघन विषय या 'भोंगा' चित्रपटातून ३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’ हा आगामी चित्रपट येत्या ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘भोंगा’ या चित्रपटाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चांगलीच प्रसिद्धी मिळविली होती. चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर चांगलाचं धुमाकूळ घातला होता. खरंतर ध्वनी प्रदूषण कमी करण्यावर या चित्रपटात जोर दिला असून या पार्श्वभूमीवर ‘भोंगा’ हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. ‘भोंगा धार्मिक नाही तर सामाजिक समस्या आहे’ हा आशयघन विषय या ‘भोंगा’ चित्रपटातून ३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हा चित्रपट अमेय खोपकर, संदीप देशपांडे, आणि अमोल कागणे फिल्मस् प्रस्तुत असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संपूर्ण जबाबदारी दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली आहे. ‘अमोल कागणे फिल्म्स’ प्रस्तुत या चित्रपटाची कथा आणि संवाद शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे यांनी लिहिली असून चित्रपटातील गाणी विजय गटलेवार यांची असून गाण्याचे बोल सुबोध पवार यांनी लिहिले आहेत.

- Advertisement -

या चित्रपटात अभिनेत्री दिप्ती धोत्रे आणि अभिनेता कपिल गडसुरकर, अमोल कागणे, श्रीपाद जोशी, आकाश घरत, दिलीप डोंबे, सुधाकर बिराजदार, अरुण गीते, महेंद्र तिसगे, रमेश भोळे, दिपाली कुलकर्णी या कलाकारांचे अभिनय पाहायला मिळणार आहेत. निर्माता, अभिनेता अमोल कागणेने याआधी ‘हलाल’ , ‘लेथ जोशी’ यासारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली होती, त्यांच्या ‘भोंगा’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेता सिनेमा, फिल्मफेअर बेस्ट फिल्म क्रिटिक २०२२ , इंडिअन इंटरनॅशनल बेस्ट फिल्म, पुणे इंटरनॅशनल बेस्ट मराठी फिल्म, महाराष्ट्र स्टेट अवॉर्डमध्ये बेस्ट फिल्म, बेस्ट डिरेक्टर, सोशल फिल्म अँड स्टोरी हे पुरस्कार या आशयघन चित्रपटाला मिळाले आहेत

‘भोंगा’ चित्रपटाची कथा ही अजाणावर भाष्य करणारी आहे. अजाणावर भाष्य करणारा हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट येत्या ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

 

 

चंद्रा आणि दौलतची प्रेमकहाणी ‘चंद्रमुखीचा’ ट्रेलर रिलीज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -