घरमनोरंजनबहुप्रतीक्षित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षकांना भुरळ

बहुप्रतीक्षित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या ट्रेलरची प्रेक्षकांना भुरळ

Subscribe

'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षाकांच्या भरघोस प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत, शिवाय आता प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक सुद्धा झाले आहेत

गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. अयान मुखर्जी यांच्या दिग्दर्शनात बनलेला ‘ब्रह्मास्त्र’ येत्या ९ जून २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर कपूरची रोमॉंटिक केमिस्ट्रीसह जबरदस्त अॅक्शन सुद्धा पाहायला मिळत आहे.

प्रेक्षकांना आवडला ‘ब्रह्मास्त्र’चा ट्रेलर
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज होताच प्रेक्षाकांच्या भरघोस प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत, शिवाय आता प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक सुद्धा झाले आहेत.’ब्रह्मास्त्र’ मध्ये रणबीर कपूरने शिवा ही भूमिका साकरली असून या चित्रपटात तो एक अग्नि अस्त्र बनला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

 या ट्रेलरच्या सुरूवातीवला महानायक अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू येतोय,ज्यामध्ये ते “जल, वायु,अग्नि……प्राचीन काळापासून आपल्यामध्ये अशी काही शक्ति आहे ,जी अस्त्रांनी व्यापली आहे”. चित्रपटातील शिवा त्याचं आयुष्य आनंदाने जगत असतो. त्यातचं त्याची भेट ईशा सोबत होते. चित्रपटात ईशाची भूमिका आलियाने साकारलेली आहे. ईशाला भेटताच शिवा तिच्या प्रेमात पडतो. तसेच या ट्रेलरमध्ये साउथ अभिनेता नागार्जुनची झलक सुद्धा दाखवण्यात आली आहे. तसेच अभिनेत्री मौनी रॉय खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे.

रणवीर आणि आलियाचा पहिला चित्रपट
ब्रह्मास्त्र हा चित्रपट रणवीर आणि आलियाचा पहिला चित्रपट असून गेल्या ५ वर्षापासून या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. अयान मुखर्जी यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन , नागार्जुन , मौनी रॉय आणि डिंपल कपाडिया सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसेच १५ जून रोजी या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज केले जाईल.

- Advertisement -

 


हेही वाचा :तुझी रोज आठवण येते, सुशांतसाठी रियाची खास पोस्ट

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -