घरमनोरंजनद व्हायोलिन’ सांगीतिक सोहळा

द व्हायोलिन’ सांगीतिक सोहळा

Subscribe

‘राजहंस प्रतिष्ठान’ ही गोरेगावमध्ये सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. या सामाजिक कार्यात रुग्णसेवेला जास्त महत्त्व दिलेले आहे. गेली सोळा वर्षे केलेल्या त्यांच्या कार्याला आता संपूर्ण महाराष्ट्र समर्पित या भावनेने या संस्थेकडेही पहातो. या प्रतिष्ठानचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे यात कलेलाही प्राधान्य दिलेले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे, शास्त्रीय संगीतात योगदान देणार्‍या गायक, वादकांना निमंत्रित करायचे हा उद्देश साकार करत असताना या संस्थेने समाजात नेत्रदीपक काम करणार्‍या गुणीजनांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करणे क्रमप्राप्त मानलेले आहे. चित्रकार, गायक, पत्रकार आणि देशासाठी शहीद झालेल्या हुतात्म्यांचा सन्मान केला जाणार आहे. सामाजिक कार्यासाठी यंदा डॉ. प्रकाश व त्यांची पत्नी मंदाताई आमटे यांची निवड झालेली आहे. गोरेगाव (पूर्व) इथल्या नंदादीप विद्यालयाच्या प्रांगणात १७ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

प्रकाश आणि मंदाताई आमटे यांचे कार्य सर्वदूर पसरलेले आहे. यांच्या कामाची नोंद परदेशातील नावाजलेल्या संस्थांनीही घेतलेली आहे. ज्या भागात आदिवासी लोकं समूहाने राहतात, आरोग्यदृष्ट्या त्यांच्याकडे पाहिले जात नव्हते अशा हेमलकसा इथल्या दुर्गम भागात जाऊन कुष्ठरोग्यांची या उभयतांनी समर्पित भावनेने सेवा केलेली आहे. ‘राजहंस’च्यावतीने त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे. देहदान, अवयवदान ही राजहंस प्रतिष्ठानची चळवळ राहिलेली आहे. असं असताना सहभागी प्रेक्षकांनी धनादेश देऊन आमटे यांच्या कार्याला सढळहस्ते मदत करावी, असे आवाहन केलेले आहे. या निमित्ताने जो सांगीतिक कार्यक्रम होणार आहे त्यात जागतिक कीर्तीचे व्हायोलिन वादक स्वर्गिय पद्मश्री पं.डी.के.दातार यांना आदरांजली वाहिली जाणार आहे. राजन माशेलकर हे ‘द व्हायोलिन’ या शिर्षकात संगीत अविष्कार घडवणार आहेत. त्याचबरोबर मराठी गीतांचा सुरेल अविष्कार घडवला जाणार आहे. सत्यजित प्रभू यांच्या संयोजनात माधुरी करमरकर, केदार पावनगडकर, डॉ. शेखर दातार, श्रेया माशेलकर, मिलिंद करमरकर यांची सुमधूर गाणी ऐकायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन अनघा मोडक ही युवती करणार आहे. पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचलन समिरा गुर्जर-जोशी यांच्यावर सोपवलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -