आमीर खानच्या आयुष्यातील ‘या’ आहेत दोन स्पेशल स्त्रिया

मागील काही दिवसांपूर्वी आमीर खान 'कॉफी विद करण 7' मध्ये आला होता. त्यावेळी त्याने त्याच्या कुटुंबाबद्दल काही गोष्टी सांगितल्या.

बॉलिवूड अभिनेता आमीर खान सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंह चड्ढा’ मुळे चांगलाच चर्चेत आहे. हिंदी टेलिव्हिजपासून ते ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत सगळीकडे या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन केलं जात आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी आमीर खान ‘कॉफी विद करण 7’ मध्ये आला होता. त्यावेळी त्याने त्याच्या कुटुंबाबद्दल काही गोष्टी सांगितल्या. आमिरच्या पत्नींबाबत आणि मुलांबाबत तर आपल्याला माहितच आहे. परंतु,आज आम्ही तुम्हाला आमिरच्या आयुष्यातील दोन खास महिलांबाबत सांगणार आहोत.

या दोन आहेत आमीरच्या आयुष्यातील खास महिला
आमीर खानच्या आयुष्यातील या दोन खास महिला म्हणजे त्याच्या सख्ख्या बहिणी आहेत. या दोघीही आमीरवर खूप प्रेम करतात. आमीर त्या दोघींपेक्षा लहान आहे, त्यामुळे त्या आमीरला खूप लाड करतात. या दोघींपैकी निखत खान प्रसिद्ध आहे. ती एक अभिनेत्री आहे. तिने बॉलिवूडमधील ‘मिशन मंगल’, ‘सांड ती आख’, ‘तान्हाजी’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूड शिवाय निखत खान हिंदी टेलिव्हिजनवरील मालिका आणि ओटीटीवरील वेब सीरीजमध्ये देखील ‘स्पेशल ऑप्स’, ‘गिल्टी माइंडस’, ‘जमाई राजा 2.0’, ‘फौदा’ आणि ‘हश हश’ यांमध्ये काम केलं आहे. सध्या निखत खान हिंदी टेलिव्हिजनवरील बन्नी चाओ होम डिलीव्हरी मध्ये दिसत आहे.

तर, आमिर खानची दुसरी बहिण फरहत खान फार प्रसिद्ध नाही. ती आपल्या पति आणि मुलांसोबत परदेशात राहते.

‘लाल सिंह चड्ढा’ लवकरच होणार प्रदर्शित

आमीर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायाकॉम 18 स्टुडिओज निर्मित, ‘लाल सिंग चड्ढा’ मध्ये करीना कपूर खान, मोना सिंग आणि चैतन्य अक्किनेनी देखील आहेत. हा चित्रपट फॉरेस्ट गंपचा अधिकृत रिमेक आहे. लाल सिंग चड्ढा 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे.


हेही वाचा :रणवीरचं समर्थन करत ‘या’ अभिनेत्रीने देखील केलं सेमी-न्यूड फोटोशूट