घरमनोरंजनइफ्फीमध्ये मराठी चित्रपट ‘गोदावरी’ला दोन पुरस्कार

इफ्फीमध्ये मराठी चित्रपट ‘गोदावरी’ला दोन पुरस्कार

Subscribe

अभिनेते जितेंद्र जोशी आणि रेनाटा कार्व्हालो यांना विशेष पुरस्कार

पणजी : मराठी चित्रपट अभिनेते जितेंद्र जोशी यांना सर्वोत्तम कलाकार (पुरुष) म्हणून रजत मयूर पुरस्कार घोषित झाला. जितेंद्र जोशी यांना ‘गोदावरी’ चित्रपटामध्ये दिवंगत मराठी कलाकार आणि चित्रपट निर्माते निशिकांत कामत यांच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबरोबरच निखिल महाजन यांचा मराठी चित्रपट ‘गोदावरी’ आणि दिग्दर्शक रॉड्रीगो दे ऑलिव्हिएरा यांच्या ‘द फर्स्ट फॉलन’ या चित्रपटात भूमिका साकारणारे ब्राझिलचे अभिनेते रेनाटा कार्व्हालो यांना परीक्षकांचा सुवर्ण मयूर विशेष पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. जेव्हा हा पुरस्कार एखाद्या चित्रपटाला जाहीर होतो तेव्हा तो त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला देण्यात येतो. ‘गोदावरी’ हा चित्रपट म्हणजे एका सशक्त नदीचे अविश्वसनीय रूपकात्मक चित्रण आहे.
Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -