घरताज्या घडामोडीOmicron Variantची काय आहेत लक्षणे? दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरांचा खुलासा

Omicron Variantची काय आहेत लक्षणे? दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरांचा खुलासा

Subscribe

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनची (Omicron Variant) जगभरात दहशत पसरली आहे. यादरम्यानच दक्षिण आफ्रिकेच्या एका डॉक्टरने ओमिक्रॉनच्या लक्षणांचा खुलासा केला आहे. या डॉक्टरने ओमिक्रॉन झालेल्या रुग्णावर उपचार करत असल्याचे म्हटले जात आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डॉक्टरने सांगितले की, या व्हेरियंटची अपरिचित लक्षणे आहेत. तसेच ही लक्षणे सौम्य होते आणि रुग्ण रुग्णालयात दाखल न होता पूर्णपणे बरा झाला. या डॉक्टरचेना नाव अँजेलिक कोएत्जी असून त्या दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनची अध्यक्ष आहेत. त्या म्हणाल्या की, त्यांनी १० दिवसांत ओमिक्रॉन व्हेरियंटच्या ३० रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांच्यामधील वेगळी लक्षणे ओळखली जात नाहीत.

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनबाबत एएफपीसोबत बातचित करताना डॉक्टर अँजेलिक कोएत्जी म्हणाल्या की, ओमिक्रॉन लागण झालेल्या रुग्णांमध्ये अत्यंत थकवा, स्नायू दुखणे, घसा खवखवणे आणि कोरडा खोकला अधिक सामान्यपणे दिसून आला आहे. काही रुग्णांच्या शरीरातलं तापमान अधिक होत. दरम्यान देशातील कोरोनाचे सध्याची परिस्थिती डेल्टा या जुन्या व्हेरियंटपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

- Advertisement -

कोएत्जी पुढे म्हणाल्या की, आम्ही असं म्हणत नाही आहोत की, पुढे कोणतेही गंभीर आजार येणार नाही. परंतु ज्या रुग्णांना आम्ही पाहिले आहे, त्यामधील ज्यांनी लस घेतली नाही आहे, त्यांच्यामध्येही सौम्य लक्षणे दिसली आहेत. युरोपात पहिल्यापासून बरेच लोकं आहेत, ज्यांना या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे, याची मला खात्री आहे. कोएत्जी यांनी ज्या रुग्णांवर उपचार केलेत त्यांच्यामध्ये जास्तीत ४० वर्षाहून अधिक वय असलेले पुरुष होते आणि त्यामधील अर्धेजण लस न घेणारे आणि लसीचा एकच डोस घेणारे होते.

ओमिक्रॉन व्हेरियंटने दक्षिण आफ्रिकेची खूप बदनामी केली आहे. यामुळे अनेक देशांनी देशातील प्रवाशांवर प्रवास निर्बंध लादून दक्षिण आफ्रिकेला वेगळं करण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च आरोग्य महासंघाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे, असे डॉ. कोएत्जी म्हणाल्या.

- Advertisement -

दरम्यान ओमिक्रॉनबाबत वैज्ञानिकांनी सतर्कता दाखवली आहे. याबाबत दक्षिण आफ्रिकेचे कौतुक केले पाहिजे आणि त्याची निंदा करू नये, असे अँजेलिक कोएत्जी म्हणाल्या.


हेही वाचा – कोरोनाच्या संकटात ऑमिक्रॉनची दहशत, ब्रिटेनमध्ये हाय अलर्ट तर दक्षिण आफ्रिकेत लॉकडाऊनला विरोध


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -