घरमनोरंजनबिग बॉसमधून त्यागराज खाडिलकर 'बेघर'

बिग बॉसमधून त्यागराज खाडिलकर ‘बेघर’

Subscribe

वाईल्ड कार्ड एन्ट्रीतून बिग बॉसच्या घरात प्रवेश केलेल्या त्यागराज खाडिलकर यांची एक्झिट झाली आहे. रेशम आणि त्यागराजमधून कोण बाहेर पडणार? याची उत्सुकता असताना त्यागराज खाडिलकर यांचं नाव घेण्यात आलं. आता पुढच्या आठवड्यात घरात काय टास्क रंगणार आणि कोणाचे खटके उडणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अशी झाली त्यागराज यांची एंट्री

बिग बॉस मराठीच्या घरातून ऋतुजा आजारी असल्यामुळे बाहेर पडली. त्यानंतर घरात नवीन कोणीतरी येणार हे माहित होतं. हर्षदा खानविलकर आल्यानंतर ती या घरात स्पर्धक म्हणून असेल असं वाटलं होतं. पण ती गेस्ट म्हणून राहून गेली. त्यानंतर एकामागोमाग एक शर्मिष्ठा राऊत, नंदकिशोर चौघुले, त्यागराज खाडिलकर यांची घरात एंट्री झाली, त्यांच्या एंट्री नंतर घरातील वातावरण पुन्हा बदलून गेलं. विशेषत: नंदकिशोर चौघुले यांनी आल्याआल्याच वादाला सुरुवात केली. तर त्यागराज घरातील दोन्ही गटात राहिल्याने इतर घरातल्यांनी ‘ब्लफमास्टर’ असं नाव देऊन टाकलं.

- Advertisement -

आता काय होणार पुढच्या आठवडयात

बिग बॉसच्या घरात टिकायचं असेल तर टास्क हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या टास्कमध्ये घरातल्यांचं न पाहिलेलं रुप पाहायला मिळालं आहे. आता पुढच्या आठवडयातला टास्क काय असणार? कोण नॉमिनेट होणार ? आणि कोणामध्ये भांडण होणारं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मेघा आणि सईला केला सपोर्ट

बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून ज्यांची मैत्री टिकून आहे ती म्हणजे मेघा आणि सईची. या जोडीला तोडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. अगदी टास्कपासून ते पर्सनल गॉसिपपर्यंत सई- मेघाला वेगळे करण्याचे प्रयत्न झाले. पण त्यागराज यांनी  सई आणि मेघाला पाठिंबा देल्याचे दिसून आले.

- Advertisement -

कोण आहे त्यागराज खाडिलकर

ख्यातनाम किर्तनकार मंजुश्री खाडिलकर अर्थात ‘किर्तन मंदाकिनी’ त्यागराज यांच्या आई. संगीतचा वारसा त्यांना त्यांच्या आईपासून मिळाला. मराठीतील अनेक गाणी त्यागराज यांनी गायली आहेत . विंचू चावला हा त्यांचा अल्बम त्या काळी तूफान गाजला.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -