घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री साहेब सिटिझन फर्स्ट; अजितदादांचे ट्विट

मुख्यमंत्री साहेब सिटिझन फर्स्ट; अजितदादांचे ट्विट

Subscribe

खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विसाव्या वर्धापनदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरु

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळालेल्या धमकीच्या पत्रावर काल टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्र्यांनी थेट परदेशातून ट्विटरवर प्रत्युत्तर दिले. मोदीजी एका पक्षाचे नेते नसून देशाचे नेते असून पवारांची टीका दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या ट्विटर वादात आता अजित पवार यांनी उडी घेतली असून ‘सिटिझन फर्स्ट’ म्हणजेच जनतेला शीर्षस्थानी ठेवून काम करा, असा सल्ला अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

काय म्हणाले अजित पवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमीच वास्तव प्रश्नांवरुन दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असतात. राज्य चालवण्याची जबाबदारी पार पाडण्यात ते अपयशी ठरलेले आहेत. आज राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. प्रत्येक शहरात असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना जनतेला शीर्षस्थानी ठेवत काम करण्याचा सल्ला अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचा विसावा वर्धापन दिन आणि पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपाचा कार्यक्रम काल पुणे येथे संपन्न झाला. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे मिळाली. अशाप्रकारची धमकी मिळाल्यानंतर शासकीय यंत्रणेचा वापर करत पत्र पाठवणाऱ्यांचा शोध घेण्याची गरज असते. मात्र भाजपने या पत्राचे भांडवल करुन लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका शरद पवार यांनी केली होती.

- Advertisement -

यानंतर लगेचच परदेश दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. ‘शरद पवार यांनी केलेली टीका दुर्दैवी असून त्यांनी द्वेषाचे नाही तर देशाचे राजकारण करावे’, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -