‘धडक’च्या ट्रेलरची धडक

dhadak
धडक पोस्टर (सौजन्य - इंडिया टीव्ही)

जान्हवी कपूर आणि इशान खट्टर हे स्टार किड्स ‘धडक’मधून बॉलीवूडमधून मोठ्या पडद्यावर लवकरच धडक देणार आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. शशांक खेतान दिग्दर्शित करण जोहर निर्मित ‘धडक’मधून ही जोडी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. आज या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित झालं आहे. हा चित्रपट २० जुलैला प्रदर्शित होत आहे.

जान्हवी आणि इशानची केमिस्ट्री

जान्हवी आणि इशानची केमिस्ट्री या ३ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे. चित्रपटातील सीन पाहताना प्रत्येक सीनमध्ये ‘सैराट’ची झलक मिळत असून संगीतदेखील मराठी चित्रपटाचीच आठवण करून देत आहे. झिंग झिंग झिंगाट गाण्याचे संगीत असो अथवा त्यातील कोरिओग्राफी सर्व काही सारखंच आहे. आर्चीच्या भूमिकेतील जान्हवी आणि परश्याच्या भूमिकेतील इशानच्या तोंडी जरी राजस्थानी संवाद असले तरीही ही जोडी प्रेक्षकांना किती आवडेल हे पाहणे रंजक ठरणार आहे.

चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच ट्रेंडमध्ये

ट्रेलर प्रदर्शित होण्याआधीपासूनच या सिनेमाचं नाव सोशल मीडियावर ट्रेंड करत होतं. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना भरघोस अपेक्षा आहेत. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननं याची निर्मिती केली असून जान्हवी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर येत आहे. इशान खट्टरचा हा दुसरा चित्रपट असून याआधी ‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याच्या सहज अभिनयानं त्यानं आधीच प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे. आता जान्हवी आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडणार का? हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कळेलच.