घरमनोरंजनउमा भेंडे लवकरच 'पुस्तक'रुपात

उमा भेंडे लवकरच ‘पुस्तक’रुपात

Subscribe

मराठी, हिंदी, तेलगू अशा विविध भाषांमध्ये अभिनयाची छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे लवकरच पुस्तकरुपात भेटीला येणार आहे. जुलै २०१७ रोजी उमा भेंडे यांनी जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्यावरील पुस्तक त्यांच्या चित्रपटविश्वातील अनेक आठवणींना उजाळा देणार आहे. ‘गंध फुलांचा गेला सांगून ‘ असे या पुस्तकाचे नाव असून ३१ मे रोजी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दादर येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे पार पडणार आहे

पुस्तकातून उलगडणार आठवणी

- Advertisement -

आपल्या अभिनयाने अनेकांची मने जिंकलेल्या अभिनेत्री उमा भेडें यांनी कृष्णधवल चित्रपटांपासून अभिनयाला सुरुवात केली. विविध भाषेतल्या पन्नासहून अधिक चित्रपटातून काम करत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. त्यांच्या या आठवणींचा प्रवास या पुस्तकातून उलगडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती चित्रकार, सिनेनिर्माते-दिग्दर्शक-अभिनेता प्रकाश भेंडे यांनीच हे पुस्तक लिहिले आहे. ‘गंध फुलांचा गेला सांगून’ असे या पुस्तकाचे नाव असून लिखित आणि ऑडिओ सीडी स्वरुपातही हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.

४२ वर्षांच्या आठवणी

- Advertisement -

प्रकाश भेंडे यांनी उमा ताईंसोबतच्या ४२ वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. अनेक कटु- गोड आठवणींनी भरलेला त्यांचा हा प्रवास होता. या पुस्तकातून प्रकाश भेंडे यांनी त्या आठवणींना उजाळा देत चित्रपटविश्वात वावरताना भेंडे दांपत्याला आलेले अनुभव समाविष्ट केले आहे. त्यामुळे पुस्तकात सिनेकर्मींचे अनुभव व त्याचे अनेक गमतीदार आणि तितकेच मनाला चटका लावणारे किस्से देखील पुस्तकातून वाचायला मिळणार आहेत.

कोण आहेत उमा भेंडे?

मुळच्या कोल्हापूरकर असलेल्या उमा भेंडे यांचे मूळ नाव अनुसया साक्रीकर .पण, लता मंगेशकर यांनी त्यांचे नामकरण ‘उमा’ असे केले. ‘नाते जडले दोन जीवांचे’ या चित्रपटात प्रकाश भेंडे आणि उमा भेंडे यांनी एकत्र काम केले. या चित्रपटानंतर त्यांनी लग्न केले. लग्नानंतर उमाताईंनी चित्रपटात काम करणे थांबवले. पण ‘श्रीप्रसाद चित्र नावाची’ निर्मिती संस्था स्थापन करुन त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली.

 

थोरांताची कमळा या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही अजरामर आहे. या चित्रपटातील गाणं (सौजन्य- अल्ट्रा व्हिडीओ)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -