घरमनोरंजनLGBTQ समुदायावरून उर्फी जावेद सद्गुरूंवर संतापली; म्हणाली, तुमचा विचारच लहान!

LGBTQ समुदायावरून उर्फी जावेद सद्गुरूंवर संतापली; म्हणाली, तुमचा विचारच लहान!

Subscribe

Urfi Javed On Sadhguru | अध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा दोन वर्षांपूर्वीच्या एका व्हिडीओवर तिने प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओमध्ये LGBTQ समुदायाची मोहीम रोखली पाहिजे असं जग्गी वासुदेव म्हणाले आहेत. त्यामुळे उर्फीने त्यांच्याविरोधात संपात व्यक्त केला आहे. 

Urfi Javed On Sadhguru | मुंबई – आपल्या अतरंगी कपड्यांमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या उर्फी जावेदने आता एक सामाजिक मुद्दा छेडला आहे. या मुद्द्यावरून तिने अध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यावर निशाणा साधला आहे. जग्गी वासुदेव यांनी एलजीबीटीक्यू समुदायाविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यामुळे उर्फीने त्यांच्याविरोधात इस्टाग्राम स्टोरीवरून टीका केली आहे.

अध्यात्मिक गुरू सद्गुरू जग्गी वासुदेव यांचा दोन वर्षांपूर्वीच्या एका व्हिडीओवर तिने प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडीओमध्ये LGBTQ समुदायाची मोहीम रोखली पाहिजे असं जग्गी वासुदेव म्हणाले आहेत. त्यामुळे उर्फीने त्यांच्याविरोधात संपात व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – चित्रा ताई ग्रेट है…; स्वत:च्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत उर्फीचा टोला

उर्फी म्हणते की, जग्गू वासूदेव यांना फॉलो करणाऱ्यांनी कृपया मला अनफॉलो करा. LGBTQ ही एक फक्त मोहीम आहे असं यांना वाटतं. मात्र, अशा मोहिमेमुळेच लोक आपल्या लैंगिकतेबाबत खुलेपणाने आणि मोकळेपणाने बोलू शकत आहे. LGBTQ समुदाय लहान नाहीय तर तुमचा विचार लहान आहे.

- Advertisement -

ती पुढच्या स्टोरीमध्ये म्हणते की, अशापद्धतीचे प्रचार रोखले गेले पाहिजेत. LGBTQ समुदायाला आपल्या पाठिंब्याची गरज आहे. गेल्या खूप शतकांपासून लोक आपली लैंगिकता लपवत आले आहेत. कोणीतरी वेगळं आहोत असं भासवण्याचा प्रयत्न झाला आहे. आपल्याला ही मोहीम राबवली पाहिजे. आपण जे आहोत ते योग्य आहोत, असं सांगण्याकरता परेड झाले पाहिजेत. तुम्हाला कोणीही आवडत असलं तरीही ते आपण स्वीकारलं पाहिजे.

हेही वाचा – उर्फीच्या तक्रारीची दखल महिला आयोग घेणार का? अध्यक्ष चाकणकर म्हणाल्या…

दरम्यान, उर्फी जावेद सार्वजनिक ठिकाणी लहान कपडे घालून फिरते यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्यावर सातत्याने आरोप केले होते. याविरोधात उर्फीने आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाडकेड धाव घेतली. या वेळी तिने सुरक्षेची मागणी केली आहे. तिची लेखी तक्रार दाखल झाल्यास आम्ही पुढील कार्यवाहीकरता पोलीस आयुक्तांकडे जाऊ, असं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -