घरमहाराष्ट्रउर्फीच्या तक्रारीची दखल महिला आयोग घेणार का? अध्यक्ष चाकणकर म्हणाल्या...

उर्फीच्या तक्रारीची दखल महिला आयोग घेणार का? अध्यक्ष चाकणकर म्हणाल्या…

Subscribe

Rupali Chakankar | महाराष्ट्रात अनेक मोठे प्रश्न आहेत. ते सोडवण्याचं काम आयोगाकडून सुरू आहे. कोणी काय घालावं याबाबतचं स्वातंत्र्य भारतीय संविधानाने आपल्याला दिलं आहे, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

Rupali Chakankar on Urfi Javed Complaint | मुंबई – प्रसिद्ध मॉडेल उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ या दोघींमधील वाद आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या दरबारी जाऊन पोहोचला आहे. उर्फी जावेदवर कारवाई व्हावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी आधीच केली होती. मात्र, या प्रकरणात कारवाई करण्यासाठी वेळ वाया घालवणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्पष्ट केली. यानंतरही चित्रा वाघ आणि उर्फी यांच्यात कलगीतुरा सुरू होता. दरम्यान, आज उर्फी जावेद हिनेच महिला आयोगाकडे धाव घेत अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची भेट घेतली. याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

हेही वाचा चित्रा वाघ यांच्या त्रासाला कंटाळून उर्फीची महिला आयोगाकडे धाव

- Advertisement -

उर्फी जावेद हिला सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता तिने सुरक्षेची मागणी केली आहे. ज्या लोकांकडून तिला वारंवार त्रास दिला जातोय त्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई व्हावी अशीही मागणी तिने आज महिला आयोगाकडे केली, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

रुपाली चाकणकर पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारींची दखल घेतली जाते. उर्फीची तक्रार आयोगापर्यंत पोहोचल्यास निश्चित पोलीस आयुक्तांपर्यंत तिची तक्रार पाठवली जाईल.

- Advertisement -

दरम्यान, महाराष्ट्रात अनेक मोठे प्रश्न आहेत. ते सोडवण्याचं काम आयोगाकडून सुरू आहे. कोणी काय घालावं याबाबतचं स्वातंत्र्य भारतीय संविधानाने आपल्याला दिलं आहे, असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

मागील अनेक दिवसांपासून गाजतोय वाद
मागील काही दिवसांपासून मॉडेल उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ यांनी टीका करत आहेत. तसेच तिच्यावर कारवाई करण्याची मागणीही चित्रा वाघ यांनी केली होती. त्यानंतर उर्फी जावेद सातत्याने ट्वीट करत चित्रा वाघ यांना डिवचत आहे. चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाकडे उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसं पत्र त्यांनी पोलिसांनाही दिलं होतं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -