घरमनोरंजन'उरी' चित्रपटातील हा अभिनेता काळाच्या पडद्याआड

‘उरी’ चित्रपटातील हा अभिनेता काळाच्या पडद्याआड

Subscribe

२०१९ च्या जानेवारी महिन्यात उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भाष्यकरणारा उरी द सर्जिकल स्ट्राइक हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

विकी कौशल या अभिनेत्याची मुख्य भूमिका असलेला ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक‘ हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गृहमंत्र्यांची भूमिका साकारलेल्या नवतेज हुंडल या अभिनेत्याचे निधन झाले आहे. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्यापतरी कळुशकलेले नाही. मात्र सिने आणि टिव्ही आर्टीस्ट असोसिएशन (सिंटा) ने ट्विट करत नवतेज हुंडल यांच्या निधनाची बातमी दिली आहे. सिंटा ने आपल्या अधिकृत ट्विटर आकाऊंटवरुन ट्विट करत नवतेज हुंडल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नवतेज हुंडल यांच्या निधनाचे आम्हाला दुःख आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो असे ट्विट सिंटा ने केले आहे.

या चित्रपटांमध्ये अभिनय

काल सोमवार ८ एप्रिलला नवतेज हुंडल यांचे निधन झाले. मुंबईतील जोगेश्वरीच्या ओशीवरा प्रकाश नगर येथे सकाळी ११ वा. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. २०१९ च्या जानेवारी महिन्यात आलेल्या ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटा व्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. ज्यामध्ये ‘खलनायक’, तेरे मेर सपने, द विस्परर्स यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. ‘उरी’ चित्रपटामध्ये नवतेज हुंडल यांनी साकारलेली गृहमंत्र्याची भूमीका विशेष लक्षवेधी ठरली. त्याच बरोबर ‘भारत की खोज’ या मालिकेत देखील त्यांनी काम केले आहे.

- Advertisement -

मुलगी ही अभिनेत्री

नवतेज हुंडल यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांची एक मुलगी अवंतिका स्टार प्लस वाहिनीवरील ‘ये है मोहब्बते’ या मालिकेत मिहिका नावाची महत्वाची व्यक्तीरेखा साकारत आहे. तर त्यांची दुसरी मुलगी मात्र बॉलिवूड जगतापासून दूर आहे. नवतेज हुंडल हे अभिनया बरोबरच या क्षेत्रात येणाऱ्या नवेदित कलाकारांना अभिनयाचे प्रशिक्षण देण्याचे काम देखील करत होते.

- Advertisement -
नवतेज हुंडल यांची मुलगी

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -