घरमनोरंजनVideo viral:ड्रेसची चैन लावण्यासाठी सनी लिओनीला घ्यावी लागली चक्क तीन लोकांची मदत!

Video viral:ड्रेसची चैन लावण्यासाठी सनी लिओनीला घ्यावी लागली चक्क तीन लोकांची मदत!

Subscribe

व्हिडिओ मध्ये पिवळ्या रंगाचा गाऊन परिधान केलेला दिसत आहे. पण त्याची जीप लावण्यसाठी तीन तीन लोकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे.

बॉलिवूड कलाकार नेहमीच आपल्या फिटनेस, फिगर,लुक्सवर विशेष मेहनत घेताना दिसतात. कोणता पब्लिक इवेंट असो किंवा सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी काढलेला फोटो असुदे सदा फिट अँड फाइन असा मंत्रा ते बाळगत असतात. या परफेक्ट लुक साठी त्यांच्या टिम मेबर्सना आणि कलाकारांना आकाश पाताळ  एक करावे लागते.
बॉलिवूडच्या बेबी डॉल सनी लिओनी  सोबत असेच काहीसे घडले आहे. सनी लियोनीला तिचा ड्रेस फिट बसेनासा झालाय. खुद्द सनीने याबाबत माहिती दिली आहे. सनीने ड्रेस ची जीप लावण्यासाठी एक दोन नाही तर तीन तीन लोकांची मदत घेतली आहे. सनीने हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊंट  शेअर केला आहे. व्हिडिओ एमटीव्ही स्प्लिट्सविलाच्या मेकअप रुम मधला आहे सनीने या व्हिडिओ मध्ये पिवळ्या रंगाचा गाऊन परिधान केलेला दिसत आहे. पण त्याची जीप लावण्यसाठी तीन तीन लोकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये सानीने लिहलं आहे की “गाऊन परफेक्ट दिसण्यासाठी आर्मीची गरज असते” असे मजेशीर अंदाजात सनीने व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

- Advertisement -

अभिनेत्री प्रियंका चोप्राने  देखील अनेकदा अश्याच समस्येला सामोरे जावे लगले होते. प्रियंकाने मुलाखती दरम्यान एक किस्सा शेअर केला होता. भल्या मोठ्या अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कर्पेट अपीयरेंस साठी तयार होत असताना तिच्या ड्रेसची जीप निघाली यावेळेस प्रियांका आणि तिची संपूर्ण टिम समोर भले मोठे संकट उभे राहिले कारण काही अंतरावरच त्या सोहळ्यात पोहचणार होती. त्यावेळेस टिम मेबेर्सने सतर्कता बाळगत ड्रेसची जीप शिवून घेतली होती. प्रियंकाला अनेकदा अश्या एमर्जन्सीचा सामना करावा लागला आहे.


हे हि वाचा –‘टायगर 3’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार इम्रान हाशमी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -