घरमनोरंजन‘वायरल फ्रायडे’ द हाऊसफुल शो

‘वायरल फ्रायडे’ द हाऊसफुल शो

Subscribe

‘पैचान कौन?’ या प्रश्नामुळे लोकप्रिय झालेला स्टँडअप कॉमेडीयन नवीन प्रभाकर सूत्रसंचालकाच्या नव्या भूमिकेतून आपल्या समोर येणार आहे. नवीन प्रभाकर सूत्रसंचालन करत असलेल्या शोचे नाव ‘वायरल फ्रायडे’ विथ नवीन प्रभाकर’ आहे. हा शो पूर्णपणे सिनेमाला वाहिलेला आहे. काही सिनेमे हे माइल स्टोन असतात. त्यामुळेच तर ते प्रेक्षकांच्या कायम स्मरणात असतात. आज काल त्याच सिनेमांचे रिल्स बनतात. ते मोठ्या प्रमाणावर व्हायरलही होतात. ‘वायरल फ्रायडे’मधून असेच मनाच्या कोपऱ्यात घर करून राहिलेले सिनेमा आपल्या भेटीस येणार आहेत. नवीन प्रभाकर या शोच्या माध्यमातून संस्मरणीय सिनेमांच्या आठवणींची पोतडी त्याच्या अनोख्या स्टाईलमध्ये आपल्या समोर उलगडणार आहे. या शोचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री सारा श्रवण या शोची मुख्य निर्माती असून ती ‘फर्स्ट रे स्टुडिओ’द्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. या आगळ्या-वेगळ्या शोची संकल्पना आणि दिग्दर्शन निलेश कुंजीर याचे असून तो या शोचा सहनिर्माता आहे. ‘वननेस फिल्म्स’बॅनरअंतर्गत त्याने शोची सहनिर्मिती केली आहे.

नवी भूमिका आणि कार्यक्रमाविषयी नवीन प्रभाकर सांगतो, “मराठी रंगभूमी आणि गाजलेल्या मराठी चित्रपटातील नामवंत कलाकार मंडळींना तर आपण सगळेच वेळोवेळी कोणत्या न कोणत्या टी.व्ही.चॅनलद्वारे पाहात आलो आहोत; पण एखाद्या सिनेमातील छोट्याशा भूमिकेत असलेल्या पण त्या सिनेमासाठी अतिमहत्त्वाच्या कलाकाराबद्दल जे कुतूहल असतं ते मात्र आपण मिस आऊट करतो. एखाद्या कलाकाराचं नाटक किंवा सिनेमातील योगदानाबद्दलचे श्रेय हे शेवटपर्यंत कुणालाच कळत नाही… अशा कलाकारांना एकत्र आणून, त्यांच्या कामाची पद्धत, त्यांच्या त्या सिनेमाविषयच्या आठवणी विशेष अनुभव त्यांच्याच तोंडून ऐकणं हे किती विलक्षण असू शकतं? तर हेच ‘वायरल फ्रायडे’ मधून बघता येतील. त्या अति महत्त्वाच्या सेलिब्रिटीजचे अनुभव कथन ऐकताना एक कलाकार म्हणून समृद्ध झालॊ; पण ते अनुभव मला माणूस म्हणून बऱ्याच गोष्टी शिकवून गेले. मीअनुभवलेला अनुभव प्रेक्षकांना नक्की येईलच. ते बोलके क्षण पावसाच्या सरींशिवाय सुद्धा नक्की चिंब भिजवतील”

- Advertisement -

सिनेमातील काही गाजलेल्या डायलॉग्जची मिमिक्री, संस्मरणीय सिनेमातील लोकप्रिय कलाकारांना सिनेमा आणि त्यातील भूमिकेविषयीच्या आठवणींना उजाळा देत बोलतं करणं आणि शेवटी दैनंदिन घडामोडींवर भाष्य करणारी एखादी पाच मिनिटांची स्टँडअप कॉमेडी असं ह्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. कार्यक्रमाचं लेखन विनोद गायकरनं केलं आहे.

‘वायरल फ्रायडे’चे सुरुवातीचे काही भाग हे शब्दभ्रमकार रामदास पाध्ये- अपर्णा पाध्ये, मंगेश सातपुते, सुकन्या मोने, जयवंत वाडकर, मनमीत पेम, सक्षम कुलकर्णी या कलाकारांवर चित्रित झाले आहेत. झपाटलेला” सिनेमा बनताना तात्या विंचू एकच होता कि अनेक?, “व्हेंटिलेटर” सिनेमा सुकन्या मोने का करणार नव्हत्या?, “पक पक पकाक” बनताना सक्षम ने एका सिनसाठी किती रिटेक दिले?, “टाईमपास” च्या सेट वर मनमीत ने असे काय केले ज्यामुळे दिग्दर्शक रवी जाधव त्याच्यावर चिडले?, “वळू” सिनेमा मध्ये डोंगरघाटात बाईक चालवणाऱ्या मंगेश ला बाईक चालवताच येत नव्हती?, “हमाल दे धमाल” मध्ये “गोविंदा रे गोपाळा” हे गाणं कसं तयार झालं? या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘वायरल फ्रायडे’ मधून मिळतील.

- Advertisement -

‘फर्स्ट रे स्टुडिओ’ आणि ‘वननेस फिल्म्स’ यांची निर्मित्ती असलेल्या या कार्यक्रमाचे सिनेमॅटोग्राफर शुभम घाणेकर, राहुल नार्वेकर, प्रथमेश भोईटे आणि प्रसन्ना रांगोळे आहेत. शोचे संकलन जगेश्वर ढोबळे आणि प्रशांत कांबळे यांनी केले आहे. शोच्या संगीताची बाजू सुरेल इंगळे याने सांभाळी आहे. हिमाली दिघे आणि रोनाक सोलगामा हे या शोचे कला दिग्दर्शक आहेत. रंभूषेची जबाबदारी सुजीत जगतापने सांभाळली आहे. सिनेमाला वाहिलेला आणि सिनेमाच्या आठवणी जाग्या करणारा ‘वायरल फ्रायडे विथ नवीन प्रभाकर’ हा आगळा -वेगळा शो ‘हंगामा’ आणि ‘मूव्ही मॅक्स’वर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.

 


हेही वाचा :

‘धोंडी चंप्या: एक प्रेम कथा’ चा धमाल विनोदी ट्रेलर प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -