घरताज्या घडामोडीसपना चौधरीचा 'बोल तेरे मीठे मीठे' व्हिडिओ सुसाट, ३ कोटींचा आकडा केला...

सपना चौधरीचा ‘बोल तेरे मीठे मीठे’ व्हिडिओ सुसाट, ३ कोटींचा आकडा केला पार

Subscribe

हरियाणवी डान्सर सपना चौधरी नेहमीप्रमाणे तिच्या डान्स स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. सपनाच्या डान्स स्टाईलमुळे तिला अनेक डान्स साँगच्या ऑफर आल्या आहेत. सोशल मीडियावर तिचे अनेक डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल झाले आहेत. पुन्हा एकदा तिचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सपना हरियाणवी साँग ‘बोल तेरे मीठे मीठे’वर डान्स करत आहे. देसी क्विनच्या या डान्स व्हिडिओवर तुफान प्रतिक्रिया येत आहेत.

- Advertisement -

सपना चौधरीचा तुम्ही हा डान्स व्हिडिओ पाहू शकता. तिचा हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की, त्याचे व्ह्यूज ३ कोटी पार झाले आहेत. जास्तीत जास्त लोक हा व्हिडिओ पाहत आहेत. सपनाचा हा व्हिडिओ त्रिमूर्ती कॅसेट्स युट्यूब चॅनेलवर पोस्ट केला गेला आहे. सपनाच्या या डान्सने लोकांची मने जिंकली आहेत. आपल्या डान्स स्टाईल सपनाने फक्त हरयाणा नाही तर पूर्ण उत्तर भारतात आपली ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे सपनाला देशाच्या कानाकोपऱ्यातून डान्स परफॉर्मेंससाठी ऑफर येत असतात.

हरियाणवी डान्सर सपना चौधरीने बिग बॉस सीझन ११च्या माध्यमातून आपल्या परफॉर्मेंसने प्रेक्षकांची मने जिंकून आपला चाहता वर्ग तयार केला. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर चाहत्यांचे सपनाला भरभरून प्रेम मिळाले. तिला अनेक चित्रपटात काम देखील मिळाले. एका चित्रपटात तिने प्रमुख भूमिका देखील साकारली आहे. पण तिचा हा चित्रपट जास्त चालला नाही. तरीही तिचे फॉलोअर्स सातत्याने वाढले. गेल्या वर्षी ६ ऑक्टोबरला सपनाचा नवरा वीर साहूने एक मोठी पोस्ट लिहून आपल्या सीक्रेट लग्नाचा खुलासा केला. तसेच त्याने लवकरच आपल्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची माहिती देखील दिली होती. काही दिवसांपूर्वी सपनाने आपल्या नव्या गाण्याचे पोस्टर रिलीज केले होते. तिच्या या गाण्याचं नाव ‘लोरी’ असू २० जानेवारीला हे गाणं रिलीज होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पाण्यावरून सपना चौधरीची सासरच्यांशी भांडणं!


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -