घरमनोरंजनपवारांऐवजी घेतले फडणवीसांचे नाव; अन् गमावले तब्बल २० लाख रुपये

पवारांऐवजी घेतले फडणवीसांचे नाव; अन् गमावले तब्बल २० लाख रुपये

Subscribe

चुकीचे उत्तर दिल्यामुळे गुजरातच्या अहमदाबादमधील चांदनी मोदी हिने कौन बनेगा करोडपती ११ च्या सीजनमध्ये तब्बल २० लाख रुपये गमावले आहेत.

सध्या महाराष्ट्रात एकच चर्चा सुरु आहे, ती म्हणजे विधानसभा निवडणुकीची. उद्या, गुरुवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे आणि नवं सरकार राज्याची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होणार आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशाच आशयाचा एक प्रश्न कौन बनेगा करोडपती ११ च्या सीजनमध्ये नुकताच विचारण्यात आला असून गुजरातमधील एक महिला स्पर्धकाला त्याचे योग्य देता आले नाही. चुकीचे उत्तर दिल्यामुळे गुजरातच्या अहमदाबादमधील चांदनी मोदी हिने तब्बल २० लाख रुपये गमावले आहेत.

- Advertisement -

तर घडले असे की,

‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोचे ११ पर्व सध्या फार सुरु आहे. स्पर्धकांच्या आयुष्यातील किस्से, त्यांनी केलेली मेहनत, त्यांच्या गोष्टी ऐकण्यात सूत्रसंचालक अमिताभ बच्चन दंग होऊन जातात. अनेकदा स्पर्धक मोठ्या रकमेपर्यंत पोहोचतात पण चुकीचं उत्तर दिल्याने त्यांना अत्यंत छोटी रक्कम घरी नेता येते. असाच एक प्रसंग नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात पाहायला मिळाला. चांदनी मोदी या उपतहसीलदार हॉटसीटवर बसल्या होत्या. प्रश्नांची उत्तरं त्या आत्मविश्वासाने देत होत्या. २५ लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत त्यांनी मजल मारली होती. पण तोपर्यंत त्यांच्याकडे असलेल्या चारही लाइफलाइन वापरुन झाल्या होत्या. २५ लाख रुपयांसाठी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. महाराष्ट्राचे आतापर्यंत सर्वांत तरुण मुख्यमंत्री कोण आहेत?, या प्रश्नावर बराच विचार केल्यानंतर चांदनी यांनी देवेंद्र फडणवीस हे उत्तर दिले. पण हे चुकीचं उत्तर असल्याने चांदनी यांनी जिंकलेली रक्कम २५ लाखांवरुन थेट ३ लाख २० हजारांवर आली. या प्रश्नाचं अचूक उत्तर शरद पवार हे होते.

हेही वाचा – 

लघुशंकेसाठी फलंदाज मैदान सोडून पळाला; व्हिडिओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -