घरमनोरंजन'तारक मेहता' मालिकेत नवा डॉ. हाथी कोण?

‘तारक मेहता’ मालिकेत नवा डॉ. हाथी कोण?

Subscribe

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये डॉ. हाथीची जागा कोण घेणार यासाठी निर्माता असित कुमार मोदीचा शोध चालू आहे. या मालिकेत डॉ. हाथीच्या भूमिकेत पुन्हा एकदा अभिनेता निर्मल सोनी दिसणार असल्याचं वृत्त आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये डॉ. हाथी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता कवी कुमार आझादचं ९ जुलैला निधन झालं. अचानक कवीच्या जाण्यामुळं त्याचं कुटुंबच नाही तर, देशभरातील त्याच्या सर्वच चाहत्यांना धक्का बसला. त्याची भूमिका मालिकेमध्ये अतिशय महत्त्वाची असून ही भूमिका आता कोण निभावणार हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं दिलेल्या वृत्तानुसार, आता डॉ. हाथीची जागा कोण घेणार यासाठी निर्माता असित कुमार मोदीचा शोध चालू आहे. वास्तविक कवी कुमार आझादची रिप्लेसमेंट शोधणं कठीण आहे, मात्र सध्या हा शोध सुरु असून लवकरच नव्या डॉ. हाथीची घोषणा करण्यात येईल.

अभिनेता निर्मल सोनी साकारणार डॉ. हाथी?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेत डॉ. हाथीच्या भूमिकेत पुन्हा एकदा अभिनेता निर्मल सोनी दिसणार असल्याचं म्हटलं आहे. २००८ मध्ये ही भूमिका निर्मल सोनी यांनीच साकारली होती. मात्र २००९ मध्ये कवी कुमार आझादनं ही भूमिका साकारायला सुरुवात केली आणि गेले ९ वर्ष त्यांनी ही भूमिका जगली.

- Advertisement -

कवीची सुरुवात झाली बॉलीवूडपासून

कवी कुमार आझाद यांनी आपल्या करिअरची सुरुवात ‘मेला’ आणि ‘फन्टुश’सारख्या चित्रपटातून केली. बिहारमधून आलेल्या कवी कुमार आझादला महत्त्वाची ओळख मिळवून दिली ती, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील डॉ. हाथी या भूमिकेनं. अभिनयाशिवाय मुंबईमध्ये त्यांचे दोन फास्ट फूड आऊटलेटदेखील आहेत. इतकंच नाही तर मीरा रोडमध्ये असणाऱ्या आपल्या आऊटलेट्समध्ये आपल्या चाहत्यांची नेहमीच कवी कुमार आझाद भेट घेत होते. ९ जुलैच्या दिवशी अचानक हार्टअटॅकनं कवी कुमार आझाद यांचं निधन झालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -