घरमनोरंजन‘द कपिल शर्मा शो’ला 'या' कलाकारांचा रामराम

‘द कपिल शर्मा शो’ला ‘या’ कलाकारांचा रामराम

Subscribe

कपिल शर्मा शो सोडणारे हे आहेत कलाकार कोण...

छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचा आवडता आणि लोकप्रिय शो म्हणून ओळख मिळवलेला कार्यक्रम म्हणजे द कपिल शर्मा शो.. या कार्यक्रमातील प्रत्येकाने प्रेक्षकांना खूप हसवले. आतापर्यंत अनेक मान्यवर मंडळींनी देखील या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यांनी देखील हा मनोरंजनाचा कार्यक्रम खूप एन्जॉय केला. मात्र आता ‘द कपिल शर्मा शो’मधून काही कलाकारांनी एक्झिट घेतल्याचे समोर आले आहे. नुकतेच कॉमेडियन भारती सिंग हिला ड्रग्स प्रकरणी अटक केल्यानंतर तिला या कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले. मात्र यापूर्वीच बऱ्याच कलाकारांनी या कार्यक्रमाला रामराम केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

- Advertisement -

प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देत असताना सर्वप्रथम अभिनेता सुनील ग्रोवर याने कपिलच्या शोमधून काढता पाय घेतला. कपील आणि सुनील यांच्या काही शुल्लक वाद झाला आणि सुनीलने हा शो सोडला असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या शोमध्ये सुनीलने साकारलेली गुत्थी, डॉक्टर गुलाटी व्यक्तिरेखा चांगल्याच गाजल्यात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

- Advertisement -

शोमधली दादी आणि नानीची भूमिका साकारणाऱ्या अली अजगरसह बुवाची भूमिका साकारणारे उपासना सिंहने कपिलच्या शोमधून काढता पाय घेतला. तसेच या सर्व कलाकारांसह नवज्योत सिंह सिद्धु यांनी देखील हा शो सोडला आहे. मात्र त्यांच्या जागी अभिनेत्री अर्चना पूरणसिंग सध्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.


‘ते’ ट्विट कंगनाला भोवलं; नेटिझन्सने पुन्हा ट्रोल केलं
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -