Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ''मी चुकलो, मला…''; क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्यानंतर विल स्मिथचा माफीनामा

”मी चुकलो, मला…”; क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्यानंतर विल स्मिथचा माफीनामा

Subscribe

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या अभिनेता विल स्मिथ यानं सूत्रसंचालक क्रिस रॉकवर भर कार्यक्रमात कानशिलात लगावली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. परंतु, अखेर आता या संपूर्ण प्रकरणानंतर विल स्मिथने एक पोस्ट शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. अभिनेता विल स्मिथनं अवघ्या काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने ''मी त्यावेळी चुकीचा वागलो'', असंही लिहिलं आहे.

जगभरात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात एक धक्कादायक घटना घडली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या अभिनेता विल स्मिथ यानं सूत्रसंचालक क्रिस रॉकवर भर कार्यक्रमात कानशिलात लगावली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. परंतु, अखेर आता या संपूर्ण प्रकरणानंतर विल स्मिथने एक पोस्ट शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. अभिनेता विल स्मिथनं अवघ्या काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने ”मी त्यावेळी चुकीचा वागलो”, असंही लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Will Smith (@willsmith)

 या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे विल स्मिथनं या संपूर्ण प्रसंगाबाबत भाष्य केलं आहे. आपली कृती ही लज्जास्पद आणि मर्यादेपलीकडची होती, असं त्यानं इन्स्टाग्रामच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. ”कोणत्याही स्वरूपात होणारी हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकादमी पुरस्कार सोहळ्यातील माझे वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होते. माझ्या खर्चाची खिल्ली उडवणे हा माझ्या कामाचा भाग आहे. पण पत्नी जाडाच्या वैद्यकीय स्थितीची खिल्ली उडवण्यात आल्यानंतर माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आणि मी भावनेच्या भरात ते पाऊल उचलले. क्रिस, या प्रकरणानंतर मला तुझी जाहीरपणे माफी मागायची आहे. मी माझी हद्द ओलांडली. मी चुकीचा होतो. मला याची लाज वाटत आहे. मी काल केलेली ही कृती मला जो माणूस व्हायचे आहे, त्यासाठी योग्य नाही. प्रेम आणि दयाळूपणाच्या जगात हिंसेला स्थान नाही. मी अकादमीची, शोचे निर्माते, सर्व उपस्थित आणि जगभरात हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाचीही जाहीर माफी मागू इच्छितो. मला विल्यम्स कुटुंबाची आणि माझ्या राजा रिचर्ड कुटुंबाचीही माफी मागायची आहे. माझ्या वागण्याने या सुंदर प्रवासावर एक डाग पडला आहे, याचे मला मनापासून खेद वाटतो. मी त्यावर काम करत आहे आणि करेन”, असं विल स्मिथनं माफिनाम्यात लिहिलं आहे.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा २८ मार्च आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉकच्या कानाखाली मारल्याचा प्रकार घडला. क्रिस रॉक सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. यावेळी क्रिसनं विल स्मिथची पत्नी जॅडाच्या आजारपणाची खिल्ली उडवली. त्याच्या विनोदानं नाराज झालेल्या विल स्मिथनं स्टेजवर जाऊन त्याला कानाखाली मारली. सुरुवातीला चाहत्यांना वाटले की हे सर्व शोच्या स्क्रिप्टचा भाग आहे. मात्र काही तासांनंतर व्हिडीओ आले ज्यात विलही रडताना दिसत होता, ज्यानंतर चाहत्यांना खात्री पटली की हे सर्व खरोखरच घडले आहे.

- Advertisement -

 या संपूर्ण प्रकरणानंतर विल स्मिथला त्याचा ऑस्कर पुरस्कार परत करावा लागू शकतो, अशीही चर्चा रंगली होती. दरम्यान, विल स्मिथने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत दिसत आहे. स्मिथच्या या पोस्टवर क्रिस रॉकनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्याची ही पोस्ट अनेक सेलिब्रिटींना लाईक केल्याचे पाहायला मिळत आहे.


हेही वाचा – मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; ठाणे स्थानकात ट्रॅक पॉईंटमध्ये बिघाड

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -