घरमहाराष्ट्रमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; ठाणे स्थानकात ट्रॅक पॉईंटमध्ये बिघाड

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; ठाणे स्थानकात ट्रॅक पॉईंटमध्ये बिघाड

Subscribe

मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील ठाणे स्थानकातील ट्रॅक पॉइंटमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळं मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील ठाणे स्थानकातील ट्रॅक पॉइंटमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळं मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

ठाणे स्थानकातील ट्रॅक पॉइंटमध्ये बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील लोकल उशिरानं धावत आहेत. लोकल जवळपास १० ते १५ मिनीट उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांचा खोळंबा होत आहे. शिवाय, ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर एक लोकल उभी आहे. त्यामुळं मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल उशिरानं धावत आहेत.

- Advertisement -

मंगळवारी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास एक लोकल ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आली. त्यावेळी ही गाडी पुन्हा मुंबईच्या दिशेनं रवाना होणार होती. परंतु, त्याचवेळी याठिकाणी एक पॉइंट फेल झाला. त्यामुळं ही लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरच अडकली. परिणामी, कल्याणच्या दिशेनं येणाऱ्या गाड्यांचा खोळंबा होत असून, इतर गाड्यांवरही त्याचा परिणाम होताना पाहायला मिळत आहे.

ही लोकल अडकल्यानं मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक उशिरानं धावतेय. तसंच, कल्याण, डोंबिवलीहून येणाऱ्या धीम्या लोकल जवळपास १५ ते २० मिनीटं उशिरानं धावत आहेत. या गाड्या मुलुंड स्थानकाच्या पुढे आल्यावर त्या जलद मार्गावर वळवल्या जात आहेत. त्यानंतर पुन्हा त्यांना धीम्या मार्गावर वळवलं जात असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

ट्रॅक पॉइंटमध्ये झालेला बिघाड सध्या मध्य रेल्वेचे कर्मचारी दुरूस्त करत आहेत. तसंच, लवकरात लवकर दुरूस्त करून लोकल वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली. दरम्यान, सकाळी ४ वाजताच्या सुमारास विठ्ठलवाडी स्थानकाजवळ मुंबईच्या दिशेनं येणऱ्या मार्गावर सिग्नल फेल झाला होता. त्यावेळी सुद्धा वाहतूक काही काळासाठी मंदावली होती.


 

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -